इंग्लंड क्रिकेट संघाचे माजी कर्णधार नासिर हुसेन यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या वेळापत्रकावर प्रश्न उपस्थित केले आहेत. हुसेनच्या मते संघांचे वेळापत्रक खूप व्यस्त असल्यामुळे खेळाडूंवर याचे गंभीर परिणाम होत आहेत. इंग्लंडाच्या कसोटी संघाचा कर्णधार आणि दिग्गज अष्टपैलू बेन स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केल्यानंतर माजी कर्णधाराची ही प्रतिक्रिया आली आहे.
भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात १-२ अशा अंतराने इंग्लडला पराभव स्वीकारावा लागल्यानंतर बेन स्टोक्स (Ben Stokes) याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. मगंळवारी (१९ जुलै) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिला एकदिवसीय सामना खेळल्यानंतर स्टोक्स या प्रकारातून निवृत्त होईल. स्टोक्सच्या या निर्णयानंतर क्रिकेटविश्वात खळवळ उडाली असून नासिर हुसेन (Nasser Hussain) यांनी प्रतिक्रिया समोर आली. एका वृत्तपत्रासाठी लिहिलेल्या कॉलममध्ये हुसेन म्हणाले की, “हे निराशाजनक आहे. यातून हेच समजते की, सध्याचा क्रिकटे वेळापत्रक कसे आहे. हे खाळाडूंना थकवणारे आहे.”
तो म्हणाले की, “जर आयसीसीने क्रिकेटचे बनवले आणि वेगवेगळे क्रिकेट बोर्ड यादरम्यान राहिलेल्या वेळात स्पर्धा आयोजित करत असतील, तर खेळाडू दीर्घ काळ खेळू शकणार नाहीत. स्टोक्सने अवघ्या ३१ व्या वर्षी एका प्रकारातून निवृत्ती घेतली, जे योग्य असू शकत नाही. अशात वेळापत्रकावर एकदा नजर टाकण्याची गरज आहे. सध्या हे एखाद्या विनोदाप्रमाणे झाले आहे.”
स्टोक्सने इंग्लंडला त्यांचा पहिला एकदिवसीय विश्वचषक जिंवण्यासाठी महत्वाचे योगदान दिले होते. अंतिम सामन्यात त्याने सर्वात मोठी खेळी करून संघाला विजय मिळवून दिला होता. हुसेन यांनी पुढे स्टोक्सच्या याच योगदानाची दखल घेतली. त्यांनी लिहिले की, “त्याच्या निवृत्तीविषयी ऐकून मला आश्चर्य वाटले. त्याने २०१९ मध्ये संघाला मोठे यश मिळवून दिले होते. जर तुम्ही मला संघातील एका खेळाडूला निवडायला लावले, तर तो स्टोक्स असेल. त्याने जरी २०१९ विश्वचषकानंतर फक्त ९ एकदिवसीय सामने खेळले असले, तरी यादरम्यान दुखापत, मानसिक स्वास्थ्य अशा कारणांमुळे तो बराच काळ संघातून बाहेर होता.”
दरम्यान स्टोक्सच्या एकदिवसीय कारकिर्दीचा विचार केला, तर एकूण १०४ सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याच्या बॅटमधून एकूण २९१९ धावा निघाल्या. तसेच गोलंदाजीत त्याने ७४ विकेट्स घेतल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पुजाराने रचला इतिहास! इंग्रजांच्या भूमीवरच करतोय काउंटी संघाचे नेतृत्व
वाढदिवस विशेष: विश्वचषक १९८३ स्पर्धेतील दुर्लक्षित नायक, ज्याने कैफ, युवराजलाही दिले होते प्रशिक्षण
‘या’ खेळाडूने शूटींग खेळाच्या विश्वचषकात फडकावला तिंरगा, सुवर्णपदक जिंकताच केला मोठा विक्रम