---Advertisement---

“विराट कोहली सर्वकालीन महान वनडे खेळाडू” इंग्लंडच्या माजी दिग्गजाचे मोठे वक्तव्य

On: मंगळवार, फेब्रुवारी 25, 2025 6:23 PM
---Advertisement---

भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) गेल्या अनेक दिवसांपासून खराब फॉर्मशी झुंजत होता. त्याच्या भविष्यातील कारकिर्दीची चर्चा देखील सुरू झाली होती. पण (23 फेब्रुवारी) रोजी, जेव्हा भारताचा सामना पाकिस्तानविरुद्ध झाला. त्यावेळी या सामन्यात कोहलीने शानदार शतक झळकावले. वनडे सामन्यांमध्ये त्याला सचिन तेंडुलकरपेक्षा (Sachin Tendulkar) वरचा दर्जा मिळाला आहे. त्यावर इंग्लंडचे दिग्गज मायकेल आथर्टन आणि हुसेन यांनी कोहलीला वनडे क्रिकेटमधील सर्वकालीन महान खेळाडू म्हटले.

विराटने पाकिस्तानविरुद्ध विजयी शतक झळकावले. त्याने आपल्या वनडे कारकिर्दीतील 51वे शतक झळकावले, ज्यामुळे त्याची आकडेवारी आणखी चमत्कारिक झाली. त्याच्या प्रभावी रेकाॅर्डने प्रभावित होऊन, इंग्लंडचे माजी कर्णधार मायकेल आथर्टन आणि नासेर हुसेन यांनी त्याचे कौतुक केले आणि त्याला सर्वकालीन महान वनडे खेळाडू म्हटले.

या काळात, तो सचिन तेंडुलकर (Sachin Tendukar) आणि कुमार संगकारा (Kumar Sangakkara) नंतर वनडे सामन्यात 14,000 धावा पूर्ण करणारा जगातील तिसरा फलंदाज बनला.

आथर्टनने स्काय स्पोर्ट्सशी बोलताना सांगितले की, “वनडे क्रिकेटमध्ये लक्ष्यांचा पाठलाग करण्याच्या बाबतीत विराट कोहलीची बरोबरी नाही. या बाबतीत, क्रिकेटच्या इतिहासात त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही.” वनडे सामन्यांमध्ये 51 शतके हा एक अविश्वसनीय आकडा आहे.

इंग्लंडच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या हुसेनने म्हटले, “तो एक अतुलनीय खेळाडू आहे. तुम्ही म्हणू शकता की तो वनडे क्रिकेटमधील सर्वकालीन महान खेळाडू आहे. आकडेवारी याची साक्ष देते, तेंडुलकर, कुमार आणि एबी डिव्हिलियर्स हे सर्व महान खेळाडू आहेत पण तो त्या सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे.”

भारताने पाकिस्तानविरुद्ध शानदार विजय मिळवला आणि आता सेमीफायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले. न्यूझीलंडलाही ग्रुप-अ मधून सेमीफायनलचे तिकीट मिळाले. (2 मार्च) रोजी न्यूझीलंड आणि भारताचे संघ आमने-सामने येतील. आता यापैकी कोणता संघ सामना जिंकण्यात यशस्वी होतो हे पाहणे मनोरंजक ठरेल.

महत्त्वाच्या बातम्या-

“सेमीफायनलपूर्वी महाभारत! भारताच्या सामन्यावर ठरेल तीन संघांचे भविष्य”
“आमची मदत धोनीही करू शकत नाही!” – पाक महिला संघाच्या माजी कर्णधाराचा संताप
IND vs NZ: ‘मोहम्मद शमीला विश्रांती द्या आणि… ‘, न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी माजी क्रिकेटपटूचा सल्ला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---