क्रिकेट जगतात दिलेल्या योगदानाबद्दल इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रुटला 12 जून रोजी ‘मेंबर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर’ पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. विंडसर कॅसल येथे झालेल्या एका समारंभात प्रिन्सेस ऍनी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. इंग्लंड क्रिकेट बोर्डने सोशल मी़डियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे.
एमबीई पुरस्कार मिळाल्यानंतर रुट म्हणाला- “हे थोडं नकारात्मक वाटतं, पण क्रिकेट हा अपयशांचा खेळ आहे. आणि मला वाटते की अपयश स्वीकारणे, हा खेळाचा एक भाग आहे हे समजून घेणे, हेच तुम्हाला शिकण्याची आणि वाढण्याची आणि अधिक चांगले होण्याची संधी देते.
👏 Joseph Edward Root, MBE 🎖
Root was today made a Member of the Order of the British Empire by the Princess Royal at Windsor Castle.@Root66 | #EnglandCricket pic.twitter.com/6dnKCWT79m
— England Cricket (@englandcricket) June 12, 2024
इंग्लंडचा माजी कर्णधार जो रुटने डिसेंबर 2012 मध्ये भारत विरुद्ध आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. आतापर्यंत त्याने 140 टेस्ट 171 एकदिवसीय तर 32 टी20 सामने खेळला आहे, आणि या तीन फाॅरमॅट मिळून त्याने 19151 धावा केल्या आहेत.
कसोटी सामना
जो रुटने 140 कसोटी सामने खेळले आहेत. या 140 सामन्यांमध्ये त्याने 56.5 च्या स्ट्राइक रेटने 11736 धावा केल्या आहेत. यामध्ये 61 अर्धशतके आणि 31 शतकांचा समावेश आहे. जो रुटचा कसोटी सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या 254 धावा आहे.
एकदिवस आंतरराष्ट्रीय
जो रुटने 171 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले आहेत. या 171 सामन्यांमध्ये त्याने 86.8 च्या स्ट्राइक रेटने 6522 धावा केल्या आहेत. यामध्ये 39 अर्धशतके आणि 16 शतकांचा समावेश आहे. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात जो रुटची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 133 धावा आहे.
टी20 आंतरराष्ट्रीय
जो रुटने 32 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या 32 सामन्यांमध्ये त्याने 126.3 च्या स्ट्राइक रेटने 893 धावा केल्या आहेत. यामध्ये 5 अर्धशतकांचा समावेश आहे. टी20आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जो रुटची सर्वाधिक धावसंख्या 90* आहे.
महत्तवाच्या बातम्या-
पाकिस्तान किंवा श्रीलंका नसून, ‘हा’ आहे आशियातील सर्वोतम दुसरा संघ, नाव ऐकून तूम्ही पण व्हाल अचंबित!
भारतीय संघाची सुपर-8 मधील सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक, पाहा एका क्लिकवर!
फ्लोरिडातील पुढील तीनही सामने पावसामुळे वाहून जातील का? भारत विरुद्ध कॅनडा सामना होणार की नाही?