---Advertisement---

धोनी की कोहली, कोण आहे श्रेष्ठ कर्णधार? १८ शतके करणाऱ्या माजी क्रिकेटपटूने दिले उत्तर

On: शनिवार, मे 29, 2021 11:28 AM
Virat Kohli and MS Dhoni
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाला दिग्गज कर्णधारांचा वारसा लाभला आहे. कपिल देव, सौरव गांगुली, मोहम्मद अझरुद्दीन अशा संघनायकांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने यशाचे शिखर गाठले आहे. याच साखळीत ‘कॅप्टनकूल’ एमएस धोनी आणि ‘रनमशीन’ विराट कोहली यांचे नाव येते. या दोन दिग्गजांची नेतृत्त्वावरुन सातत्याने तुलना होत असते.

कधी धोनी किंवा कोहलीच्या नेतृत्त्वाखाली खेळलेले क्रिकेटपटूच त्यांची तुलना करतात. तर कधी परदेशी क्रिकेटपटूही यात सहभागी होतात. नुकतेच इंग्लंडचा माजी फलंदाज मायकल वॉन याने धोनी आणि कोहली यांच्यापैकी श्रेष्ठ कर्णधाराचे नाव सांगितले आहे.

एमएस धोनीच्या नेतृत्त्वाची कमाल
धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाचा आयसीसी स्पर्धांमध्ये दबदबा राहिला आहे. तो भारतीय संघाला तिन्ही स्वरुपात चषक जिंकून देणारा पहिला आणि एकमेव कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने २००७ सालचा पहिलावहिला टी२० विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर २०११ मध्ये वनडे विश्वचषकावरही नाव कोरले होते. सोबतच २०१३ मध्ये चॅम्पियन ट्रॉफीही पटकावली होती.

विराट कोहलीने भारतीय संघाला बनवले कसोटीचा किंग
कोहलीच्या नेतृत्त्वाविषयी बोलायचे झाल्यास, अद्याप त्याला भारतीय संघाला एकही आयसीसी चषक जिंकून देता आला नाही. परंतु त्याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ कसोटी क्रिकेटचा बादशहा बनला आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्याच्या नेतृत्त्वाखाली भारताने सर्वाधिक ३६ कसोटी सामने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या भूमीत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाला कसोटी पराभूत करण्याचा पराक्रमही भारताने त्याच्याच नेतृत्त्वाखाली केला आहे. एवढेच नव्हे तर, त्याने जागतिक कसोटी अजिक्यंपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही भारताला पोहोचवले आहे.

धोनी अन् विराटमध्ये कोण उत्कृष्ट?
अशात क्रिकट्रॅकर वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत १८ आंतरराष्ट्रीय शतके करणाऱ्या वॉनला धोनी आणि कोहली या दिग्गजांपैकी कोण सर्वश्रेष्ठ कर्णधार आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना वॉन म्हणाला की, “धोनी. माझ्या मते धोनी एक मार्गदर्शक आहे. विशेषत: पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये. याखेरीज टी२० क्रिकेटमध्येसुद्धा तो एक कर्णधार म्हणून श्रेष्ठ राहिला आहे. त्याने भारतीय संघासाठी जे काही केले आहे, ते अप्रतिम होते.”

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएल २०२१च्या सर्वात महागड्या खेळाडूला मिळाला ‘नवा खरेदीदार’, पाहा संघाचे नाव 

भारत कोहलीपेक्षा जास्त ‘या’ व्यक्तीचा संघ, इंग्लंडच्या माजी खेळाडूचे लक्षवेधी भाष्य

वर्ल्डकप असो वा चॅम्पियन्स ट्रॉफी, आयसीसी चषकांवर ‘या’ कर्णधारांचेच अधिराज्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---