जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023 चा अंतिम सामना अवघ्या काही तासांवर आला आहे. या सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ आमने-सामने असणार आहेत. या सामन्याआधी ऑस्ट्रेलिया संघ पूर्णपणे तयार असल्याचे दिसत आहे. त्याचवेळी त्यांनी मैदानाबाहेर आपल्या खेळाडूंना मदत करण्यासाठी थेट ख्यातनाम प्रशिक्षक ऍंडी फ्लॉवर यांना पाचारण केले. या अति महत्त्वाच्या सामन्यात ते सल्लागार म्हणून संघाला मदत करतील.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या 2021-2023 या सायकलमध्ये अव्वल क्रमांकावर राहत ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत आपली जागा बनवली. असे असताना अंतिम सामन्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक असताना त्यांनी सल्लागार म्हणून फ्लॉवर यांना सपोर्ट स्टाफचा भाग बनवले. ऑस्ट्रेलियाला या सामन्यानंतर इंग्लंडमध्येच पाच सामन्यांची प्रतिष्ठेची ऍशेस कसोटी मालिका खेळायची आहे. इंग्लंडला त्यांच्या घरच्या मैदानात पराभूत करण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ पूर्ण प्रयत्न करेल.
फ्लॉवर यांना इंग्लंडमध्ये काम करण्याचा मोठा अनुभव आहे. 2009 ते 2014 या काळात ते इंग्लंड संघाचा भाग होते. त्यांच्या मार्गदर्शनात इंग्लंडने 2010 टी20 विश्वचषक जिंकलेला. याव्यतिरिक्त ते जगभरातील सर्वात जास्त मागणी असलेले प्रशिक्षक आहेत. सध्या ते आयपीएलमध्ये लखनऊ सुपरजायंट्स संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहतात. त्यांच्या याच आजवरच्या अनुभवाचा फायदा करून घेण्याचा ऑस्ट्रेलिया संघाचा प्रयत्न राहील.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ: पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, ऍलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, मायकल नेसर, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, टॉड मर्फी, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर
(Former England Headcoach Andy Flower Joined Australia Sqaud Ahead WTC Final And Ashes)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
महाराष्ट्र इंटरनॅशनल चेस फेस्टीव्हलमध्ये चॅलेंज लढतीत विदित गुजराथी, रौनक साधवानी यांना विजेतेपद
WTC FINAL: यंदाही पाऊस ठरणार विलन? असे असणार लंडनमधील वातावरण, टीम इंडियासाठी…