इंग्लंड महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार क्लेयर कोनोर आता एक नवीन जबाबदारी पार पाडणार आहेत. कोनोर आता क्रिकेटच्या नियमांचे संरक्षण करणाऱ्या मोरिलबोर्न क्रिकेट बोर्डाच्या (एमसीसी) अध्याक्षपदी नियुत्क झाल्या आहेत. एमसीसीच्या २३४ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाचा एका महिलेल्या या पदावर नियुक्त करण्यात आहे आहे.
कोनोर सध्या इंग्लंड ऍंड वेल्स क्रिकेट बोर्डाच्या महिला क्रिकेट निर्देशक आहेत. त्यांना २०२० एमसीसीमध्ये या पदासाठी नामांकन मिळाले होते, पण कोरोनामुळे त्यांचा कार्यकाळ उशिरा सुरू झाला. कोनोरच्या आधी श्रीलंकेचा दिग्गज आणि माजी कर्णधार कुमार संगकारा या पदावर कार्यरत होते आणि त्यांनीच कोनोरच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता.
एमसीसीने कोनोरच्या हवाल्याने सांगितले आहे की, “एमसीसीची अध्यक्ष होऊन मी खूप खुश आहे. मी यासाठी कुमार संगकाराला धन्यवाद देऊ इच्छित आहे, ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, जेणेकरून मी या खेळाचे भले करू शकेल, ज्याच्यावर मी सर्वात जास्त प्रेम करते. मी ड्रेसिंग रूममध्ये आणि बोर्डरूममध्ये जो अनुभव मिळवला आहे, मी त्याचा पूर्ण वापर करण्याचा प्रयत्न करेल. जेणेकरून मी क्लबला सपोर्ट करू शकेल आणि जे बाकीचे लोक आहेत, समित्या आहेत त्यांच्यासोबत सामील होऊन पुढचे १२ महिने चांगले काम करू शकेल. मी एमसीसीच्या टीमचा भाग होऊन आनंदी आहे.”
कोनोरची क्रिकेटमधील कारकीर्द
कोनोरच्या कारकिर्दीचा विचार केला तर, त्यांनी १९९५ मध्ये वयाच्या १९ व्या वर्षी इंग्लंड संघासाठी पदार्पण केले होते. त्या २००० साली इंग्लंडच्या कर्णधार झाल्या. त्यानंतर एका वर्षाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघाचे नेतृत्व केले. इंग्लंड संघाने कोनोरच्या नेतृत्वात २००५ साली ऍशेस मालिकाही जिंकली होती. इंग्लंडने त्यावेळी तब्बल ४२ वर्षांनंतर पहिल्यांदा ऍशेस मालिका जिंकली होती. कोनोरने या ऍशेस मालिकेत इंग्लंडला विजय मिळवून दिल्यानंतर क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
कोनोरसोबतच या लोकांची झाली आहे नियुक्ती
एसीसीने ब्रूस कार्नेजी ब्राउनला क्लबच्या चेयरमन पदावर नियुक्त केले आहे. ते जोराल्ड कोरबेटची जागा घेतील. कोरबेट यांनी मागच्या सहा वर्षांपासून हे पद सांभाळले होते. त्यांचा कार्यकाळ ३० सप्टेंबरला संपला आहे. ते सध्या लाॅयड्स ऑफ लंडनचे चेयरमन आहेत. तसेच सँटेंडर बँकिंग ग्रुपचे वाइस चेयरमन आहेत. ते १९९७ पासून एमसीसीचे सदस्य आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
खेळ मजामस्तीचा! नाणेफेकीवेळी रिषभ-रोहितने एकमेकांची उडवली खिल्ली ; मजेशीर क्षण कॅमेऱ्यात कैद
आयपीएलचा ‘थलैवा’! कधीही न मोडणारा विक्रम धोनीने केला आपल्या नावे
मैदानातून थेट दवाखान्यात! चौकार वाचवण्याच्या प्रयत्नात ‘हा’ स्टार पाकिस्तानी क्रिकेटर जखमी