भारत आणि न्यूझीलंड यांच्यात येत्या १८ ते २२ जून दरम्यान विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्याकरिता दोन्ही संघांनी कसून सरावाला सुरुवात केली आहे. कसोटी क्रिकेटचा किंग कोण होणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. अशातच अनेक दिग्गजांनी भारत आणि न्यूझीलंड संघाची प्लेइंग ११ निवडली आहे. यात आता माजी इंग्लिश खेळाडूची ही भर पडली आहे.
इंग्लंड संघासाठी ५० कसोटी आणि २६ वनडे सामने खेळलेल्या माँटी पानेसरने देखील विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी भारतीय संघाची प्लेइंग ११ ची निवड केली आहे. त्याने आपल्या संघात सलामी फलंदाज म्हणून शुबमन गिल आणि रोहित शर्मा यांना संधी दिली आहे. या संघात केएल राहुल आणि मयंक अगरवाल असताना देखील त्याने गिलची ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरची कामगिरी पाहता त्याला आपल्या संघात स्थान दिले आहे.
त्याने मध्यक्रमात कुठलाही बदल केला नाही. तिसऱ्या क्रमांकावर चेतेश्वर पुजारा, नंतर विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि त्यानंतर रिषभ पंतला स्थान दिले आहे.
पानेसरने आपल्या संघात रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा या दोन्ही फिरकी गोलंदाजांना संघात स्थान दिले आहे. तसेच त्याने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, “भारतीय संघाने अश्विन आणि जडेजा या दोन्ही खेळाडूंसोबत मैदानात उतरायला हवं. कारण सध्या क्रिकेट विश्वात दोघांपेक्षा श्रेष्ठ कोणीच नाहीये. हे दोघे गोलंदाजीमध्येही भागीदारी करतात. दोघेही एकमेकांच्या खेळण्याच्या कौशल्याला परिचित आहेत. दोघेही हुशार आहेत.”
तसेच वेगवान गोलंदाज म्हणून त्याने आपल्या संघात जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि ईशांत शर्मा यांना संधी दिली आहे. ही तिकडी विश्वातील कुठल्याही खेळपट्टीवर फलंदाजांना अडचणीत टाकू शकते.
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी माँटी पानेसरने निवडलेली प्लेइंग ११
रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी.
महत्त्वाच्या बातम्या –
वयाचा हवाला देत निवडकर्त्यांनी केलं दुर्लक्ष; उनाडकट म्हणाला, ‘मी ३३ नाही २९चा आहे’
पाकिस्तान बोर्डाच्या खराब आयोजनामुळे माजी कर्णधाराची फजिती, अबू धाबीच्या विमानाकडून ‘नो एंट्री’!
‘तेव्हा भट्टी तापलेली होती, म्हणून मी…,’ मांजरेकरांसोबतच्या २ वर्षे जुन्या विवादावर जडेजाचा खुलासा