Friday, March 31, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अखेर पीटरसनने घेतली पंतप्रधान मोदींची भेट! खास कॅप्शनसह पोस्ट केले छायाचित्र

March 3, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter/Kevin Pieterson

Photo Courtesy: Twitter/Kevin Pieterson


इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार व दिग्गज फलंदाज केविन पीटरसन (Kevin Pietersen) हा सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर तो अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये भाग घेताना दिसतोय. त्याचाच एक भाग म्हणून त्याने शुक्रवारी (3 मार्च) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली. स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने याबाबतची माहिती दिली.

पीटरसन याने आपल्या व मोदी यांच्या भेटीचे छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट केले. त्या छायाचित्राला कॅप्शन देत त्याने लिहिले,

An honor to speak so passionately and warmly about the release of cheetahs on your birthday, Sir @narendramodi. Thank you for your infectious smile and firm handshake.
I really look forward to seeing you again, Sir! 🙏🏽 pic.twitter.com/9gEe3e1wwV

— Kevin Pietersen🦏 (@KP24) March 3, 2023

‘माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्हाला भेटलो. यावेळी चित्त्यांना मुक्त करण्याबाबत तुमच्याशी अतिशय चांगला संवाद झाला याचा आनंद आहे. या उपक्रमाला तुमचे सहकार्य मिळाले यासाठी भविष्यात पुन्हा तुम्हाला भेटण्यासाठी उत्सुक आहे.”

पंतप्रधान मोदी यांना भेटण्याच्या एक दिवस आधी पीटरसन भारताचे गृहमंत्री अमित शहा यांना देखील भेटला होता. त्या भेटीबद्दलही त्याने माहिती सार्वजनिक केली होती. पीटरसन यापूर्वी देखील पंतप्रधान मोदी यांचे अनेकदा कौतुक करताना दिसला आहे. कोविड काळात त्याने भारत सरकारला अनेक सूचना केलेल्या, तसेच पंतप्रधान मोदींचे आभारही व्यक्त केलेले. तसेच त्याने आपल्याला मोदी यांना भेटण्याची इच्छा असल्याचे म्हटलेले.

पीटरसन हा इंग्लंडचा माजी कर्णधार राहिला आहे. खेळाडू म्हणून आपल्या कारकीर्दीत तो अनेकदा भारत दौऱ्यावर आलेला. निवृत्तीनंतर देखील तो समालोचन करण्यासाठी अनेकदा भारतात येतो. आयपीएलमध्ये तो यावेळी देखील समालोचन करताना दिसेल. पीटरसन प्राण्यांच्या संवर्धनासाठी कार्य करतो. यासाठी तो अनेकदा जगभरातील मान्यवरांची भेट घेत असतो.

(Former English Cricketer Kevin Pietersen Meet Prime Minister Narendra Modi For Social Cause)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘या’ पंजाबी अभिनेत्रीवर आख्खं पाकिस्तान फिदा, पीएसएलमधील सामन्यादरम्यान चाहत्याची पोस्टरसोबत एन्ट्री
आदिल रशीदचा नाद पराक्रम! बांगलादेशविरुद्ध 4 विकेट्स घेताच ब्रॉडच्या विक्रमही काढला मोडीत, रेकॉर्ड पाहाच


Next Post
Jasprit Bumrah

"आता त्याला विसरा" विश्वविजेत्या खेळाडूने बुमराहच्या कारकिर्दीवरच लावले प्रश्नचिन्ह

fOOTBALL

आमदार चषक स्पर्धेसाठी 16 संघ; शासकीय पॉलिटेक्निक मैदानावर होणार स्पर्धा

Shane Warne

'लिजेंड वॉर्नी'चा शेवट झाला तरी कसा? क्रिकेटचा भरभरून आनंद दिलेला शेन वॉर्न जाताना मात्र सर्वांनाच चटका लावून गेला, वाचा

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143