माजी भारतीय यष्टीरक्षक फलंदाज जसवंत बक्रानिया यांचे मंगळवारी (13 सप्टेंबर) बेंगलोर येथे निधन झाले आहे. ते 74 वर्षांचे होते. त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सौराष्ट्र आणि गुजरात संघाकडून क्रिकेट खेळले होते. त्यांच्या मृत्यूनंतर सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने शोक व्यक्त केला आहे.
पूर्व आफ्रिकाच्या झिंझा शहरात जन्मलेले बक्रोनिया यांचे कुटुंब राजकोटला स्थायिक झाले होते. त्यामुळे बक्रानिया यांनी सौराष्ट्र आणि राजकोट संघांकडून क्रिकेट खेळले. 1970 ते 1983 यादरम्यान दोन्ही संघांत त्यांनी यष्टीरक्षक फलंदाजाची भूमिका बजावली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांनी 56 प्रथम श्रेणी सामने खेळले होते. यादरम्यान 32.34च्या सरासरीने त्यांनी 3137 धावा केल्या होत्या. यात त्यांच्या 5 शतकांचाही समावेश होता.
याबरोबरच त्यांनी प्रथम श्रेणीत यष्टीमागे 51 फलंदाजांला झेलबाद आणि 12 फलंदाजांना यष्टीचीत केले होते. तर अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्यांनी 11 सामने खेळले होते. या 11 सामन्यांमध्ये त्यांनी 33 च्या सरासरीने 264 धावा केल्या होत्या. क्रिकेटमधील निवृत्तीनंतर त्यांनी आयएसएससीओसाठी काम केले आणि क्रिकेटचा विकास करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
बक्रोनियांच्या मृत्यूनंतर दु:ख व्यक्त करताना सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने लिहिले की, “जसवंतभाईंच्या दुःखद निधनाबद्दल सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमधील प्रत्येकाकडून त्यांचे भाऊ अश्विन बक्रानिया आणि त्यांच्या कुटुंबातील प्रत्येकाला सांत्वना. जसवंतभाईंच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्रिकेटर अर्जुनने महिला क्रिकेटर वेदा कृष्णमूर्तीला केले फिल्मी स्टाईल प्रपोज
शमीसह ‘या’ चार खेळाडूंवर बीसीसीआयला नाही विश्वास! टी20 विश्वचषकासाठी घेतले मात्र…
‘या’ भारतीयाच्या विकेटने २९ वर्षांपूर्वी झाली होती शेन वॉर्न पर्वाची सुरुवात…