भारतीय संघ डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात दबावात दिसत आहे. लंडनच्या के ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात भारतीय संघाची वरची फळी फ्लॉप ठरली. कर्णधार रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांसारखे दिग्गज फलंदाज फार वेळ क्रीझवर टिकू शकले नाही. एवढंच काय, तर त्यांना 20 धावांचाही आकडा पार करता आला नाही. विशेष म्हणजे, 18 महिन्यांनी भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या अजिंक्य रहाणे याने भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या. त्याला शार्दुल ठाकूर आणि रवींद्र जडेजा यांचीही साथ मिळाली. या तिघांच्या खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात 296 धावा केल्या होत्या. अशात आता भारताची वरची फळी पाहून माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी संताप व्यक्त केला.
काय म्हणाले शास्त्री?
रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी स्टार स्पोर्ट्सशी बोलताना भारतीय खेळाडूंवर संताप व्यक्त केला. त्यांनी भारतीय फलंदाजांना विचारले की, आयपीएल की राष्ट्रीय कर्तव्य? दोन्हींपैकी त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचे काय?
ते म्हणाले की, “जर तुम्ही फ्रँचायझी क्रिकेटला प्राथमिकता दिली, तर डब्ल्यूटीसी अंतिम सामना विसरून जावा. जर तुमच्यासाठी देशासाठी खेळणे गरजेचे आहे, तर बीसीसीआयने करारात हा नियम बनवला पाहिजे की, त्यांना एका अशा खेळाडूची गरज आहे, ज्याला देशासाठी खेळण्याची आवड असेल.”
यासोबतच त्यांनी असेही म्हटले की, “बीसीसीआयला आधी आयपीएलमध्ये हा नियम आणायला पाहिजे की, शक्य असेल, तर ते स्टार खेळाडूंना आयपीएलमधून कधीही बाहेर करू शकतात. कारण, त्यांची गरज आगामी स्पर्धेत भासू शकते.”
ऑस्ट्रेलिया संघाचे पारडे जड
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावात 469 धावा केल्या. यानंतर आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खूपच खराब राहिली. रोहित शर्मा, शुबमन गिल यांच्यापासून ते विराट कोहली याच्यापर्यंत सर्व फलंदाज स्वस्तात तंबूत परतले. भारतीय संघाकडून रहाणेने 89 धावांची सर्वोत्तम खेळी केली. तसेच, जडेजाने 48 धावा आणि शार्दुलने 109 चेंडूत 51 धावा केल्या.
या तिघांच्या जोरावर भारताने 296 धावा केल्या. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 61 षटकापर्यंत 5 विकेट्स गमावत 161 धावा केल्या आहेत. यावेळी कॅमरून ग्रीन (21) आणि ऍलेक्स कॅरे (20) क्रीझवर नाबाद राहिले. (former head coach ravi shastri angry on rohit sharma team india top order failure wtc final 2023 )
महत्वाच्या बातम्या-
हेडची विकेट काढताच जड्डूने कसोटीत रचला इतिहास! ‘असा’ विक्रम रचणारा बनला पहिलाच भारतीय
BREAKING: चमिंडा वासची MPL मध्ये एन्ट्री, सांभाळले ‘या’ संघाचे प्रशिक्षकपद