---Advertisement---

फक्त बेन स्टोक्स भारताकडून पाहिजे; टीम इंडियाला जगात कुणी पराभूत करु शकत नाही, पहा कोण म्हणतंय हे

---Advertisement---

इंग्लंडचा स्टार अष्टपैलू क्रिकेटर बेन स्टोक्सने एकट्याच्या जीवावर इंग्लंडला कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात शानदार विजय मिळवून दिला. याचबरोबर संघाने मालिकेत वेस्ट इंडिजविरुद्ध १-१ बरोबरी साधली.

पहिल्या कसोटीत व्हिलन ठरलेला स्टोक्स लगेच दुसऱ्या कसोटी सामन्यात हिरो ठरला. फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षणात तो खऱ्या अर्थाने कसोटीत हिरो ठरला. याचमुळे या सामन्याचा तो हिरो ठरला. सध्या याच खेळाडूचे जगभरात कौतूक होत आहे.

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणनेही स्टोक्सचे कौतूक करताना मोठे भाष्य केले आहे. ‘भारतीय संघ जर त्यांच्याकडे स्टोक्स असेल तर जगात अपराजित राहिलं’, असे भाष्य पठाणने केले आहे. पठाणने आपले हे मत ट्विटरच्या माध्यमातून मांडले आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्यात स्टोक्सने २५० धावा करतानाचा ३ विकेट्स दोन्ही डावांत मिळून घेतल्या होत्या. यामुळे अशी कामगिरी करणारा तो इंग्लंडचा पहिला क्रिकेटर ठरला होता. तर जगात फक्त ८ खेळाडूंनी असा कारनामा केला आहे.

नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसी कसोटी क्रमवारीत अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत गेले १८ महिने क्रमांक १ वर असलेल्या होल्डरला मागे सारत स्टोक्स पहिल्या स्थानावर आला आहे. तर फलंदाजांच्या क्रमवारीत तो तिसऱ्या स्थानावर आला आहे. पहिल्या स्थानावर स्टिवन स्मिथ तर दुसऱ्या स्थानावर विराट कोहली आहे. ऍंड्रयू फ्लिंटॉफनंतर आयसीसी कसोटी क्रमवारीत अष्टपैलू खेळाडूंत पहिल्या स्थानावर येणारा तो दुसराच खेळाडू आहे.

वाचा- खुशखबर! कोहली आणि कंपनी आयपीएलपुर्वी खेळणार या देशाविरुद्ध ३ टी२० सामने?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---