---Advertisement---

वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी या भारतीय क्रिकेटपटूने घेतली क्रिकेटच्या सर्वप्रकारातून निवृत्ती

On: शनिवार, सप्टेंबर 1, 2018 9:27 AM
---Advertisement---

भारताचा माजी क्रिकेटपटू सुब्रमण्यम बद्रिनाथने शुक्रवारी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीचा निर्णय जाहिर केला आहे. त्याने हा निवृत्तीचा निर्णय त्याच्या 38 व्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी घोषित केला.

त्याने भारताकडून दोन कसोटी, सात वनडे आणि एक टी20 सामना खेळले आहेत. बद्रिनाथने सांगितले की तो मागील एक वर्षापासून निवृत्तीचा विचार करत होता आणि त्याने कुटुंबाला वेळ देता यावा यासाठी हा निर्णय घेतला आहे.

निवृत्तीबद्दल पत्रकारांशी बोलताना बद्रिनाथ म्हणाला ‘मला माझ्या कुटुंबाबरोबर वेळ घालवायचा आहे. ते माझे प्राधान्य आहे. तसेच हा निर्णय घेण्यासाठी कुटुंब ही गोष्टही महत्त्वाची होती. तसेच माझ्या प्रेरणेची पातळीही मागील काही वर्षांपासून कमी झाली आहे.’

‘फिटनेस ही माझ्यासाठी समस्या नव्हती. पण मी मागील एक वर्षापासून निवृत्तीचा विचार करत आहे.’

38 वर्षीय बद्रिनाथने नुकतेच तमिळनाडू प्रीमियर लीगच्या तिसऱ्या मोसमात कराइकुडी कालाइ संघाचे प्रशिक्षणपद सांभाळले आहे.

तसेच तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये एक दशकापेक्षा जास्त तमिळनाडूकडून रणजी स्पर्धेत खेळला आहे. त्यानंतर तो विदर्भ आणि हैद्राबादकडूनही रणजी स्पर्धेत खेळला आहे.

त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये 145 प्रथम श्रेणी सामन्यात 54.49 च्या सरासरीने 10245 धावा केल्या आहेत. यात त्याने 32 शतके आणि 45 अर्धशतके केली आहेत. तसेच तो ‘अ’ दर्जाच्या  144 सामन्यात खेळला असून यात 36.84 च्या सरासरीने 6 शतके आणि 28 अर्धशतकांसह 4164 धावा केल्या आहेत.

त्याचबरोबर त्याने आयपीएलमध्येही चेन्नई सुपर किंग्जकडून 95 सामने खेळले आहेत.यात त्याने 30.65 च्या सरासरीने 1441 धावा केल्या आहेत. तसेच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 सामन्यात एकूण 145 धावा केल्या आहेत.

या निवृत्तीनंतर भविष्यात राज्याचे प्रशिक्षकपद सांभाळण्याचा काही विचार आहे का, या प्रश्नावर उत्तर देताना बद्रिनाथ म्हणाला, “आत्ता सध्यातरी मला माहित नाही. नजीकच्या काळात माझ्यासाठी हे खूप आवघड आहे. कारण मी सध्या समालोचक आहे. त्यामुळे मी व्यस्त असतो. मी यावर अजून कोणता निर्णय घेतलेला नाही.

तसेच तो त्याने कारकिर्दीत जे काही मिळवल आहे त्याबद्दल आनंद वाटत आहे असेही तो म्हणाला.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

चौथी कसोटी: पुजारा-बुमराहच्या भागिदारीने टीम इंडियाची पहिल्या डावात आघाडी

एशियन गेम्स: भारतीय महिला हॉकी संघाचे दुसऱ्यांदा सुवर्ण पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले

एशियन गेम्सचा पाॅकेटमनी सीमा पुनीया देणार केरळमधील महापूर ग्रस्तांना

तीन एशियन गेम्समध्ये पदक मिळवणारा तो ठरला पहिलाच भारतीय बॉक्सर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment