आगामी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेपूर्वी भारताच्या प्लेइंग इलेव्हनविषयी अनेक दिग्गजांनी मोठमोठी विधानं केली आहेत. यामध्ये आता भारतीय संघाचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याचाही नंबर लागला आहे. सेहवागच्या मते भारत आपल्या मुख्य फलंदाजी फळीत ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांना सामील करणार नाही. चला तर, सेहवाग असे का म्हणाला जाणून घेऊयात…
खरं तर, भारतीय संघाने वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी आपला मजबूत 15 सदस्यीय संघ निवडला आहे. भारताचा फलंदाजी क्रम खूपच मजबूत आहे. भारताच्या वरच्या फळीत शुबमन गिल, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची जागा पक्की आहे. मात्र, मधल्या फळीत संघाकडे श्रेयस अय्यर, केएल राहुल, ईशान किशन आणि सूर्यकुमार यांसारखे अनेक पर्याय आहेत.
सेहवाग काय म्हणाला?
आघाडीच्या क्रिकेट वेबसाईटशी बोलताना वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) म्हणाला, “सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर केएल राहुल आणि हार्दिक पंड्या राहतील. तेव्हा सूर्यकुमार यादव या दोन्ही स्थानावर नसेल. पाचव्या स्थानी कुणीही नाहीये. मात्र, जर हार्दिक तुमचा सहावा गोलंदाज आहे, तर राहुल पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करेल आणि हार्दिक सहाव्या. त्यानंतर गोलंदाज येतील. आपल्याला वाटले की, ईशान लाईनअपमध्ये फिट बसेल, पण श्रेयसने शतक केले आहे, तो जर चौथ्या क्रमांकावर खेळला, तर पाचव्या आणि सहाव्या स्थानी राहुल आणि हार्दिक खेळतील.”
पुढे बोलताना सेहवाग म्हणाला, “आता हे यावर अवलंबून आहे की, भारत आपल्या संयोजनाकडे कसे पाहतो. त्यांना वाटते की, हार्दिक 10 षटके टाकेल. कारण, यामुळे भारताला अतिरिक्त गोलंदाजी पर्याय मिळेल. त्यामुळे सूर्यकुमार फिट बसत नाही. जर जागा असेल, तर ईशानलाही त्याच्याऐवजी संधी मिळेल. कारण, तो एक डावखुरा फलंदाज आहे.”
भारताचा पहिला सामना
भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेतील आपल्या अभियानाला 8 ऑक्टोबरपासून सुरुवात करणार आहे. भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नई येथील एमए चिदंबरम स्टेडिअमवर खेळला जाईल. या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (former india batter virender sehwag predictions for indias line up says this cricketers will not be first choice batters)
हेही वाचा-
अश्विनने भारतीय संघाला दिला विजयाचा मंत्र; म्हणाला, ‘तुम्ही दवाबात…’
विश्वचषकात मॅक्सवेल करणार ऑस्ट्रेलियाची गोची! भारतीय दिग्गज म्हणाला, ‘त्याच्या बॅटमधून धावा…’