सध्या भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद सिराज याचे नाव घेतले जाते. वनडे व कसोटी क्रिकेटमध्ये तो भारतीय वेगवान माऱ्याचे नेतृत्व करतोय. मागील वर्षभरात त्याने सर्वोत्तम कामगिरी करत वनडे गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानही पटकावले आहे. त्याच्या या यशानंतर भारताचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी त्याच्या बाबतीतील एका जुन्या आठवणीचा उलगडा केला.
सिराज 2021 पासून भारताचा सर्वात यशस्वी वनडे गोलंदाज राहिला आहे. नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या तसेच न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत दमदार गोलंदाजी करत त्याने वनडे क्रमवारीत पहिले स्थान काबीज केले. त्याच्या या यशानंतर भारताचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण हे चांगलेच खुश दिसले. त्यांनी सिराजची एक जुनी आठवण सांगितली.
एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले,
“काही वर्षांपूर्वी आरसीबीसोबत पहिला हंगाम खेळल्यानंतर सिराज माझ्याकडे आला. तो विराटचा मोठा चाहता आहे. तो माझ्याकडे येऊन मला म्हणाला, मला विराटसारखे व्हायला आवडेल. त्यावर मी म्हटलो की, त्यासाठी तुला भरपूर त्याग करावा लागेल. त्यावर त्याने होकार देत कोणतेही कष्ट व त्याग करण्याची तयारी दर्शवली.”
अरुण हे भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक असतानाच सिराज भारतीय संघाचा सदस्य झाला होता. सुरुवातीच्या काळात अपयशी ठरल्यानंतर त्याने आयपीएल 2020 नंतर स्वतःमध्ये कमालीचा बदल घडवून आणला. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकलेल्या भारतीय संघाचा तो प्रमुख स्तंभ होता. त्यानंतर सातत्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो चमकताना दिसत आहे. 2021 टी20 विश्वचषकानंतर भारतीय संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिलेले अरुण हे सध्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रशिक्षक आहेत.
(Bharat Arun Reveal Mohammad Siraj Want Become Bowling Virat Kohli)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग! सेमीफायनलपूर्वीच टीम इंडियाला झटका, दोन प्रमुख खेळाडू एकाचवेळी बाहेर
ब्रेकिंग! टीम इंडियातील मराठमोळ्या क्रिकेटपटूवर कोसळला दुःखाचा डोंगर, सर्वकाही सोडून थेट घरी परतला