यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकाला (ICC T20 World Cup) (2 जून) रोजी शुभारंभ झाला. हा टी20 विश्वचषक अमेरिका (America) आणि वेस्ट इंडीज (West Indies) या दोन देशात खेळला जात आहे. परंतु भारतीय संघ वेळापत्रकानुसार त्यांचा पहिला सामना (5 जून) रोजी आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे. तत्पूर्वी भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा या टी20 विश्वचषकानंतर कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे भारतीय संघाचा प्रशिक्षक कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
भारताचे माजी प्रशिक्षक लालचंद राजपूत (Lalchand Rajput) यांना वाटतं आहे की, गौतम गंभीर (Gautam Gambhir) भारतीय क्रिकेटला खूप पुढे घेऊन जाईल, तो भारतीय संघासाठी उत्कृष्ट दर्जाचा प्रशिक्षक होईल. त्यानं भारतासाठी दोन वेळा विश्वचषक जिंकला आहे. गंभीरनं भारताच्या प्रशिक्षक पदासाठी अर्ज केला की नाही हे अद्दाप स्पष्ट झालं नाही. म्हटले जात आहे की, राहुल द्रविडनंतर गौतम गंभीर भारतीय संघाच्या प्रशिक्षकाची जागा घेईल. परंतु प्रशिक्षक पदासाठी अर्ज करण्याची तारीख संपली आहे. भारतानं लालचंद राजपूत कोच असताना 2007 मध्ये टी20 विश्वचषक जिंकला होता.
लालचंद राजपूत म्हणाले, “गौतम गंभीर भारताच्या प्रशिक्षक पदासाठी योग्य आहे. भारतीय क्रिकेटला तो चांगल्या प्रकारे समजतो. गंभीर एक बुद्धिमान खेळाडू आहे. त्यानं खेळाडूच्या रुपात दोन विश्वचषक जिंकले आहेत. तो भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदासाठी चांगला उमेदवार आहे. परंतु बीसीसीआय (BCCI) प्रशिक्षक पदासाठी कोणाची नियुक्ती करणार हे त्यांच्यावर अवलंबून आहे.”
पुढे बोलताना राजपूत म्हणाले, “तुमच्याकडे भारतीय प्रशिक्षक होण्यासाठी अनुभव पाहिजे. तुम्ही नवीन संघासोबत जाऊ शकत नाही. कारण विश्वचषकात दबाव असतो. जर तुम्ही आमचा 2007चा टी20 विश्वचषकातील संघ पाहिला तर त्यामध्ये वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, इरफान पठाण, हरभजन सिंह, आरपी सिंह आणि युवराज सिंह यांच्यासारखे अनुभवी खेळाडू होते. तर रोहित शर्मा, रॉबिन उथप्पा, दिनेश कार्तिक यांच्यासारखे युवा खेळाडू होते.
महत्त्वाच्या बातम्या-
स्काॅटलंडनं जिंकला टाॅस; प्रथम फलंदाजीचा निर्णय, जाणून घ्या दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
वसीम जाफरची टी20 विश्वचषकबाबत भविष्यवाणी, म्हणाला ‘अंतिम सामना’ या दोन संघांमध्येच होणार!
विराट कोहलीनं सलामीला यावं की नाही? माजी खेळाडूनं दिली प्रतिक्रिया