भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. तत्पूर्वी भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचे मत आहे की भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पांढऱ्या चेंडूच्या फॉरमॅटमध्ये महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) इतकाच कुशल रणनीतिकार आहे आणि तो या फॉरमॅटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे.
रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतानं 2024च्या फायनल सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करुन टी20 विश्वचषक जिंकला. यासह रोहित भारताचा सर्वात यशस्वी टी20 कर्णधार बनला ज्याच्या नेतृत्वाखाली भारतानं 62 पैकी 49 सामने जिंकले. महेंद्रसिंह धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) नेतृत्वाखाली भारतानं 72 पैकी 41 सामने जिंकले.
भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) आयसीसी पुनरावलोकनमध्ये म्हणाले, रोहित एक कुशल रणनीतीकार आहे हे आपण विसरु नये. धोनीसह तो सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक असेल. जर तुम्ही मला विचाराल की कोण चांगला कर्णधार आहे तर मी म्हणेन की पांढऱ्या चेंडूच्या फाॅरमॅटमध्ये दोघंही समान आहेत. रोहितसाठी ही एक मोठी प्रशंसा आहे कारण धोनीनं काय केलं हे सर्वांना माहित आहे. रोहितही मागे नाही आणि त्यानं टी20 विश्वचषकात चमकदार नेतृत्व केलं आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
कोल्हापूरकर स्वप्नील कुसाळेसाठी सतेज पाटलांनी पेटारा उघडला, जाहीर केलं मोठं बक्षीस
दिग्गज क्रिकेटपटूनं घेतला जगाचा निरोप! अशी होती अंशुमन गायकवाड यांची कारकीर्द
SL vs IND : वनडे मालिका सुरू होण्यापूर्वीच श्रीलंकेच्या अडचणीत वाढ, दोन खेळाडूंची माघार