आगामी आयपीएल (IPL) हंगामाची चाहत्यांना नक्कीच उत्सुकता लागली असेल. त्याआधी मेगा लिलाव होणार आहे. यंदाचा मेगा लिलाव (24 आणि 25 नोव्हेंबर) दरम्यान सौदी अरेबिया जेद्दाह येथे होणार आहे. पण आगामी आयपीएल मेगा लिलावापूर्वी (Delhi Capitlas) दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) केवळ 4 खेळाडूंना कायम ठेवले आहे. दिल्लीने कर्णधार रिषभ पंतलाही (Rishabh Pant) सोडले.
रिषभ पंत दीर्घ काळानंतर मेगा लिलावात दिसणार आहे. त्यामुळे अनेक मोठ्या फ्रँचायझींनी पंतला मेगा लिलावात खरेदी करण्याच्या योजना आधीच आखल्या असतील. मात्र यादरम्यान रिषभ पंतच्या किमतीबाबत सुरेश रैनाने (Suresh Raina) मोठे वक्तव्य केले आहे.
दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) अक्षर पटेल (Axar Patel), कुलदीप यादव (Kuldeep Yadav), ट्रिस्टन स्टब्स (Tristan Stubbs) आणि अभिषेक पोरेल (Abishek Porel) यांना कायम ठेवले आहे. 2016 पासून पंत दिल्ली फ्रँचायझीचा भाग होता. मेगा लिलावात पंतला मोठी मागणी असेल. दरम्यान, सुरेश रैनाने टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना पंतच्या किंमतीबद्दल सांगितले.
सुरेश रैना (Suresh Raina) म्हणाला, “याकडे आपण संधी म्हणून पाहिले पाहिजे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर नजर टाकली तर त्यांना लिलावात मोठ्या प्रमाणात पैसे मिळत आहेत. मग आमचे खेळाडू का नाहीत? तो (पंत) एक कर्णधार आहे, उत्तम खेळाडू आहे, उत्तम यष्टिरक्षक आहे. जर तुम्ही त्याची ब्रँड व्हॅल्यू पाहिली तर तो एंडोर्समेंटसाठी चांगला आहे, म्हणून त्याला 25-30 कोटी मिळायला हवेत. ज्यासाठी तो पात्र आहे.”
Rishabh Pant has entered the IPL 2025 mega auction with the highest base price of ₹2 crore 💵
Set to be one of the most sought-after stars, he is bound to spark a bidding war! 🤑
If you were to buy him for your team, what trade offer would you make, and which team would you… pic.twitter.com/bdzyBSezyi
— Sportskeeda (@Sportskeeda) November 19, 2024
पुढे बोलताना सुरेश रैना म्हणाला, “रिषभमध्ये कुठेही विजेतेपद जिंकण्याची क्षमता आहे. त्याने दिल्लीसाठी विजेतेपद जिंकण्याचा प्रयत्न केला आणि खूप मेहनत घेतली. सीएसकेला देखील एक उत्कृष्ट संघ बनवायचा आहे. त्यांच्याकडे 55 कोटी शिल्लक आहेत आणि जर त्यांनी 25-30 कोटींना एक खेळाडू विकत घेतला तर त्यांना किमान 18 खेळाडूंचा संघ बनवावा लागेल. पंजाबकडे 110.50 कोटी रुपये, दिल्लीकडे आरटीएम कार्ड आहे. पंत आरसीबीकडे गेल्यास मला आश्चर्य वाटणार नाही, कारण तेही कर्णधाराच्या शोधात आहेत.”
रिषभ पंत दुखापतीमुळे आयपीएल 2023 मध्ये सहभागी होऊ शकला नाही, परंतु 2024 मध्ये त्याने शानदार पुनरागमन केले. पंतने आयपीएल 2024 मध्ये 13 सामन्यांमध्ये 40 पेक्षा जास्त सरासरीसह 155.40च्या स्ट्राइक रेटने 446 धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL Mega Auction; ‘हे’ अष्टपैलू खेळाडू ठरणार सर्वात महागडे! माजी क्रिकेटपटूची मोठी भविष्यवाणी
भारताने तिसऱ्यांदा पटकावले चॅम्पियन्स ट्राॅफीचे विजेतेपद! फायनलमध्ये चीनचा उडवला धुव्वा
“असा कोणीही नाही ज्याची…” रोहित शर्माबद्दल माझी भारतीय क्रिकेटपटूचे मोठे वक्तव्य!