भारताचे माजी कसोटीपटू माधव आपटे यांचे आज(23 सप्टेंबर) सकाळी वयाच्या 86 व्या वर्षी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये निधन झाले.
त्यांनी भारताकडून 7 कसोटी सामने खेळले होते. या 7 कसोटी सामन्यात 49.27 च्या सरासरीने 542 धावा केल्या होत्या. यामध्ये त्यांनी एक शतक आणि 3 अर्धशतके केली होती.
आपटे यांनी नोव्हेंबर 1952 मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी सामन्यातून भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तसेच ते शेवटचा कसोटी सामना वेस्ट इंडीज विरुद्ध मार्च-एप्रिल 1953 मध्ये खेळले.
त्यांनी वेस्ट इंडिज विरुद्ध 1953मध्ये एका कसोटी मालिकेत 460 धावा केल्या होत्या. त्यावेळी एका कसोटी मालिकेत 400 पेक्षा अधिक धावा करणारे ते पहिलेच भारतीय क्रिकेटपटू होते.
याबरोबरच त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 67 सामन्यात 38.79 च्या सरासरीने 3336 धावा केल्या होत्या. यामध्ये त्यांनी 6 शतके आणि 16 अर्धशतके केली. त्यांनी 1958-59 आणि 1961-62 ला रणजी ट्रॉफीचे विजेतेपद मिळवलेल्या मुंबई संघाचे नेतृत्वही केले होते.
भारताचे माजी क्रिकेटपटू विनू मंकड यांनी आपटेंच्या क्रिकेट कारकिर्दीत महत्त्वाची भूमिका निभावली होती.
आपटे वयाच्या 70 वर्षापर्यंत कांगा लीगमध्ये खेळत होते. त्यांचा भाऊ अरविंद आपटेही भारताकडून 1 कसोटी सामना खेळला. तसेच आपटेंचा मुलगा वामन यांनी भारताकडून स्क्वॉश खेळले आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–हार्दिक पंड्याचा कॅच घेत डेव्हिड मिलरने केली या विश्वविक्रमाची बरोबरी
–गौतम गंभीर म्हणतो ‘या’ दिग्गज भारतीय क्रिकेटपटूची जर्सी निवृत्त करा
–सातत्याने टीकेला सामोरे जाणाऱ्या रिषभ पंतला या माजी भारतीय क्रिकेटपटूने दिला पाठिंबा