आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2023 स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाकडून जवळचा पराभव झाला. ऑस्ट्रेलिया महिला संघाने भारतीय महिला संघाला 5 धावांनी पराभवाचा धक्का दिला. यामुळे कोट्यवधी भारतीयांच्या अंतिम सामन्यात पोहोचण्याच्या आशांना सुरूंग लागला. पराभवानंतर काहींनी महिला संघाला पाठिंबा दिला, तर अनेकांनी टीकास्त्र डागले. त्यात भारताच्या माजी कर्णधार डायना एडुलजी यांचाही समावेश होता. त्यांनी भारतीय खेळाडूंना चांगलेच फटकारले आहे. त्यांनी म्हटले की, संघाला अव्वलस्थानी पोहचण्यासाठी खेळाडूंना ‘दंडूक’ दाखवण्याची गरज आहे. स्टार कल्चर संपवून बीसीसीआयला कठोर निर्णय घ्यावे लागतील.
वृत्तसंस्थेशी बोलताना डायना एडुलजी (Diana Edulji) यांनी राग व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, “मी वरिष्ठ खेळाडूंपेक्षा जास्त फिट अंडर-19 संघाला पाहिले आहे. ते अंतिम सामन्यात चिंतेत पडल्या नाहीत. भारत सेमीफायनलमध्ये चोक होण्याची ही काय पहिली वेळ नाहीये. संघासोबत 2017पासून 2023पर्यंत असे होत आले आहे.”
That's that from our semi-final game.
Australia win by 5 runs.
Scorecard – https://t.co/fVVsNjFbjU #INDvAUS #T20WorldCup pic.twitter.com/lq17aY6L9W
— BCCI Women (@BCCIWomen) February 23, 2023
बीसीसीआयला संपवावे लागेल स्टार कल्चर
डायना पुढे बोलताना म्हणाल्या की, “बीसीसीआयने स्टार कल्चर संपवले पाहिजे. संघाला अव्वलस्थानी पोहोचवण्यासाठी त्यांना दंडुक दाखवण्याची गरज आहे. बीसीसीआयने तुम्हाला एकसारख्या मानधनाचा अधिकार दिला आहे. तरीही तुम्ही प्रत्येक वेळी जिंकलेला सामना हारता. आता ही सवय झाली आहे. बीसीसीआयला कठोर निर्णय घेण्याची गरज आहे.”
यो-यो टेस्टची मागणी
“भारताच्या खराब क्षेत्ररक्षणामुळे महिला क्रिकेटमध्येही यो-यो टेस्ट झाली पाहिजे. मात्र, हे महिलांसाठी कठीण आहे. 15पैकी 12टेस्टमध्ये या नापास होतील. मात्र, सध्याच्या तुलनेत एक मजबूत संघ मिळेल, जो स्वत:च्या फिटनेससाठी ओळखला जाईल. यावेळी खेळाडूंची संघासाठी काहीच जबाबदारी नाहीये,” असेही पुढे बोलताना त्या म्हणाल्या.
सामन्याबद्दल बोलायचं झालं, ऑस्ट्रेलियाने भारतापुढे 173 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान पार करताना भारताला संघर्ष करावा लागला. एकेवेळी असे वाटत होते की, संघाला विजय मिळेल, परंतु हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) ही बाद झाल्यामुळे आशा धुळीस मिळाल्या. तिने सामन्यात शानदार फलंदाजी करत 52 धावांचे योगदान दिले. तिने जेमिमा रॉड्रिग्ज (43) हिच्यासोबत महत्त्वाची भागीदारी रचली. मात्र, सामन्यात ती दुर्दैवीरीत्या बाद झाली. सामन्यात ऋचा घोषने 14, दीप्ती शर्माने नाबाद 20 धावांचे योगदान दिले. स्नेह राणा 11 धावा करून तंबूत परतली. मात्र, संघाला शेवटी 167 धावाच करता आल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने हा सामना 5 धावांनी खिशात घातला. (former indian captain edulji criticize indian women team after defeat in the t20 world cup semi final against australia)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंकेने निवडला भक्कम संघ, WTCच्या फायनलवर डोळा
आयपीएल किमतीपेक्षा महाग विकला गेला TNPL मधील खेळाडू, पाच सामन्यांतच केलेले स्वतःला सिद्ध