---Advertisement---

वर्ल्डकपच्या झगमगाटापासून दूर, माही मित्रांसोबत लुटतोय सुट्यांचा आनंद! पाहा व्हिडिओ

On: शनिवार, जून 22, 2024 3:12 PM
Ms Dhoni
---Advertisement---

आयपीएल 2024 (IPL 2024) चा हंगाम संपल्यानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. अनेक पार्ट्यांव्यतिरिक्त धोनी रांचीच्या रस्त्यांवर बाईक चालवताना दिसला होता. परंतु, महेंद्रसिंग धोनीचा नवा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये धोनी त्याच्या मित्राचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे.

धोनीचे चाहते या व्हिडिओला भरभरुन प्रेम देत आहेत. क्रिकेट चाहत्यांना त्यांच्या आवडत्या खेळाडूला पाहून खूप आनंद झाल्याचं पाहायला मिळत आहे. याआधी धोनी कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेत होता. धोनी त्याच्या कुटुंबासोबत पॅरिसमध्ये एफिल टाॅवरच्या ठिकाणी फोटोशूट करताना दिसला होता. तर आता तो त्याच्या एका जवळच्या मित्राचा वाढदिवसस सेलिब्रेट करताना दिसत आहे.

 

या व्हिडिओवर सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून त्यांचा फीडबॅक देत आहेत. याआधी आयपीएल 2024 मधून चेन्नई सुपर किंग्जचा संघ बाहेर पडल्यानंतर धोनी दुसऱ्याच दिवशी रांचीच्या रस्त्यांवर बाईक चालवताना दिसला होता. तो व्हिडिओ देखील सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.

नुकत्याच झालेल्या आयपीएल 2024 मध्ये महेंद्रसिंग धोनीनं कर्णधार पद सोडलं आणि संघाचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याच्याकडे सोपवण्यात आलं होतं. गायकवाडच्या नेतृत्वाखाली चेन्नईचा संघ आयपीएल 2024 च्या प्लेऑफ मध्ये पोहचू शकला नाही. विराटच्या राॅयल चॅलेंजर्स बंगळुरु संघानं त्यांचा साखळी सामन्यात पराभव करुन बाहेर काढलं.

धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जनं 5 वेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. तर त्याच्या नेतृत्वाखाली भारतानं 2011 ला शेवटचा विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर भारतानं टी20 विश्वचषक आणि एकदिवसीय विश्वचषक जिंकला नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

एका संघाचा उपांत्य फेरीच्या शर्यतीतून पत्ता कट, तर दुसरा संघ बाहेर जाणाच्या वाटेवर सुपर 8 ची स्थिती काय?
एका चीअरलीडरच्या प्रेमात क्लीन बोल्ड झाला होता क्विंटन डी कॉक! खूपच फिल्मी आहे लव्ह स्टोरी
आयुष्यात कशाची खंत आहे? गौतम गंभीर म्हणाला, “2011 विश्वचषकाची फायनल पुन्हा खेळलो तर…”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---