भारतीय संघाकडून खेळलेले असे काही खेळाडू आहेत, ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकल्यानंतरही त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे. या खेळाडूंमध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याचाही समावेश होतो. धोनीने 2020मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याच्या निवृत्तीला 2 वर्षे उलटली आहेत, पण त्याचा चाहतावर्ग कमी झाला नाही. दिवसेंदिवस त्याच्या चाहत्यांमध्ये भर पडत आहे. धोनीचा प्रत्येक फोटो आणि व्हिडिओ येताच, तो सोशल मीडियावर व्हायरल होतो. अशातच त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो सर्वांचे लक्ष वेधत आहे. या व्हिडिओत धोनीसोबत दोन भारतीय खेळाडूही दिसत आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत असे म्हटले जात आहे की, एमएस धोनी (MS Dhoni) याने नवीन इलेक्ट्रिक गाडी विकत घेतली आहे. तसेच, तो रांचीच्या रस्त्यांवर फेरफटका मारण्यासाठी निघाल्याचे दिसत आहे.
केदार जाधव आणि ऋतुराज गायकवाडही दिसले व्हिडिओत
व्हिडिओत दिसते की, एममएस धोनी गाडीमध्ये चालकाच्या जागेवर बसला आहे. तसेच, क्रिकेटपटू केदार जाधव (Kedar Jadhav) आणि ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) हेदेखील त्याच्यासोबत गाडीत बसत आहेत. ट्विटरवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओबद्दल असे म्हटले जात आहे की, हा व्हिडिओ रांचीचा आहे, जिथे चेन्नई सुपर किंग्स संघाचा माजी खेळाडू केदार जाधव आणि सध्याचा सहकारी ऋतुराजही पोहोचले आहेत. धोनीला गाड्यांची खूपच आवड आहे. त्याच्याकडे अनेक महागड्या कार आणि बाईक्स आहेत.
.@MSDhoni takes Ruturaj Gaikwad on a Car Ride at Ranchi yesterday. 😍💛pic.twitter.com/HIxVRMGTnB
— DHONI Era™ 🤩 (@TheDhoniEra) November 17, 2022
धोनीला मिळू शकते भारतीय संघात मोठी जबाबदारी
भारतीय संघाला आयसीसीच्या 3 ट्रॉफी जिंकून देणाऱ्या धोनीविषयी असेही म्हटले जात आहे की, त्याला भारतीय संघाच्या टी20 क्रिकेट प्रकाराचा संचालक बनवले जाऊ शकते. त्याच्यावर भारतीय संघाकडून टी20 विश्वचषक 2024साठी तयारी करवून घेण्याची जबाबदारी असेल. मात्र, याबद्दल अद्याप बीसीसीआयकडून कोणतेही भाष्य करण्यात आले नाहीये.
आयपीएल 2023नंतर घेऊ शकतो निवृत्ती
दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्स संघासाठी आयपीएल 2023 हा धोनीचा शेवटचा हंगाम असू शकतो. असे म्हटले जात आहे की, धोनी या हंगामानंतर व्यावसायिक क्रिकेटमधून पूर्णपणे निवृत्ती घेईल. मात्र, धोनी कधी काय निर्णय घेतो, हे त्याच्याशिवाय इतर कुणालाही माहिती नाही. (former indian captain ms dhoni new electric car ruturaj gaikwad kedar jadhav)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मी स्वप्नातही सूर्यकुमारसारखे शॉट मारू नाही शकत’, न्यूझीलंडच्या दिग्गज फलंदाजाची कबुली
धोनी ते युवराज, ‘हे’ 5 दिग्गज भारतीय बनू शकत नाहीत टीम इंडियाचे निवडकर्ते; पण का?