MS DHONI INCLUDED IN THE ICC HALL OF FAME: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीचा आयसीसी ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश केला आहे. आंतरराष्ट्रीय आणि भारतीय क्रिकेटमधील उत्कृष्ट योगदानासाठी त्याला हा सन्मान मिळाला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या (WTC Final 2025) फक्त 2 दिवस आधी लंडनमध्ये एक समारंभ आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये एमएस धोनीसह 7 दिग्गज क्रिकेटपटूंना हॉल ऑफ फेमने सन्मानित करण्यात आले आहे.
एमएस धोनी व्यतिरिक्त, मॅथ्यू हेडन, ग्रॅमी स्मिथ, डॅनियल व्हेटोरी आणि हाशिम आम्ला यांनाही हॉल ऑफ फेमने सन्मानित करण्यात आले आहे. या यादीत समाविष्ट होणारा धोनी 11 वा भारतीय क्रिकेटपटू बनला आहे. आंतरराष्ट्रीय निवृत्तीनंतर जवळजवळ 5 वर्षांनी धोनीला हा सन्मान मिळाला आहे. 15 ऑगस्ट 2020 रोजी धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. एमएस धोनीचा शेवटचा सामना 2019च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत झाला होता.
एमएस धोनीला ‘कॅप्टन कूल’ म्हणून ओळखले जात असे, जो सर्वात यशस्वी भारतीय कर्णधारांपैकी एक होता. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 3 आयसीसी ट्रॉफी जिंकल्या. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत 2007 चा टी20 विश्वचषक, 2011चा वनडे विश्वचषक आणि 2013ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. (MS Dhoni is one of India’s most successful captains)
आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश असलेले भारतीय क्रिकेटर
1) सुनील गावस्कर
2) बिशनसिंग बेदी
3) कपिल देव
4) अनिल कुंबळे
5) राहुल द्रविड
6) सचिन तेंडुलकर
7) विनू मांकड
8) डायना एडुलजी
9) वीरेंद्र सेहवाग
10) नीतू डेव्हिड
11) एमएस धोनी*
???? MS DHONI INCLUDED IN THE ICC HALL OF FAME ????
— Johns. (@CricCrazyJohns) June 9, 2025
– The Greatest ever. ???? pic.twitter.com/voSyiAozjY
Indian cricketers inducted into ICC Hall Of Fame:
— Johns. (@CricCrazyJohns) June 9, 2025
1) Sunil Gavaskar
2) Bishan Singh Bedi
3) Kapil Dev
4) Anil Kumble
5) Rahul Dravid
6) Sachin Tendulkar
7) Vinoo Mankad
8) Diana Edulji
9) Virender Sehwag
10) Neetu David
11) MS Dhoni* pic.twitter.com/Eus4AEh4eD






