भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली नेहमी त्याच्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पडताना दिसतो. संघाची निवड, आयपीएल वेळापत्रक, देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेंविषयीचे काही निर्णय अशा बऱ्याच गोष्टीत तो स्वत: लक्ष घालत असतो. त्यामुळे त्याच्या सक्रियतेची कित्येक माजी क्रिकेटपटू प्रशंसा करत असतात. परंतु माजी भारतीय कर्णधार दिलीप वेंगसरकर हे गांगुलीच्या सक्रियतेवर खुश नाहीत.
टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना ते म्हणाले की, “जेव्हा आयपीएल सामन्यांच्या दिनांक, स्थान अशा गोष्टींवर चर्चा होऊ लागली होती, तेव्हा गांगुली आयपीएलचा अध्यक्ष असल्याप्रमाणे बोलत होता. हे खूप दु:खद आहे. गांगुली इतरांच्या वतीने बोलून स्वत: बद्दलची विश्वसनीयता कमी करत आहे. त्याला असे तर म्हणायचे नाही ना की, त्याला इतरांपेक्षा जास्त गोष्टींचे ज्ञान आहे. माझ्या मते क्रिकेट हा माजी खेळाडूंद्वारे चालवला जाणारा खेळ आहे. मला गांगुलीकडून खूप अपेक्षा होत्या. पण आता त्याच्या वागणूकीला पाहून माझे मन बदलू लागले आहे.”
तसेच भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा याला आयपीएल दरम्यान हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला येत्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर संधी देण्यात आली नव्हती. परंतु, आता तो दुखापतीतून सावरल्यामुळे त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे.
याविषयी बोलताना वेंगसरकर म्हणाले की, “भारतीय संघाची निवड समिती किंवा बोर्डातून कुणीही रोहित शर्माच्या फिटनेसविषयी वक्तव्य केले नव्हते. परंतु गांगुलीने एकट्याने या गोष्टीची पुष्टी दिली होती की, रोहित लवकर बरा झाला तर तो फ्लाइटमध्ये असेल. पण आतापर्यंत जे घडले ते नक्की काय होते?. बीसीसीआयच्या फिजिओने रोहितला दुखापत झाल्याचे सांगत भारतीय संघात निवडले नाही, तर दूसऱ्या बाजूला मुंबई इंडियन्सचे फिजिओ त्याला आयपीएल सामने खेळू देत आहेत. दोन फिजिओंचे वेगवेगळे मत कसे काय असू शकते?.”
महत्त्वाच्या बातम्या-
यू ही चला चल माही! युएईवरुन मायदेशात परतलेला धोनी लुटतोय ‘या’ गोष्टीचा आनंद
फायनलमध्ये सलामीला फलंदाजी करणार का नाही?, पाहा काय म्हणाला मार्कस स्टॉयनिस
ट्रेंडिंग लेख-
RCB च्या कर्णधारपदी कुणाची लागू शकते वर्णी? ही ३ नावे चर्चेत
मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ
मुंबईवर भारी पडणार दिल्लीचा संघ; ‘हे’ चार खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये