---Advertisement---

“त्यांना भीती…”- टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान भारताविरुद्ध खेळणार नसल्याच्या चर्चेवर माजी भारतीय कर्णधाराचं मोठं विधान

On: बुधवार, फेब्रुवारी 4, 2026 9:43 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) माजी निवडकर्ते कृष्णमाचारी श्रीकांत यांनी १५ फेब्रुवारी रोजी भारता विरुद्धच्या टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयावर कडक शब्दांत टीका केली आहे. पाकिस्तान सरकारने रविवारी आपल्या संघाला ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या आगामी आयसीसी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी परवानगी दिली, परंतु सोबतच ही घोषणा केली की ते त्यांच्या कट्टर प्रतिस्पर्ध्याविरुद्ध (भारत) गट फेरीतील सामना खेळणार नाहीत. मात्र, या सामन्यातून माघार घेण्याच्या निर्णयामागचे अधिकृत कारण त्यांनी अद्याप आयसीसीला दिलेले नाही. आपल्या युट्यूब चॅनेलवर बोलताना श्रीकांत यांनी दावा केला की, पाकिस्तानने खेळण्याचा निर्णय घेतला तरी त्याने काही विशेष फरक पडला नसता.

​१९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडू असलेल्या श्रीकांत यांनी पाकिस्तानचा उल्लेख “रिकाम्या घागरी, ज्यांचा आवाज जास्त होतो” असा केला. श्रीकांत म्हणाले, “उथळ पाण्याला खळखळाट फार. पाकिस्तान घाबरलेला आहे. आता अंडर-१९ वर्ल्ड कपमध्येही त्यांचा पराभव झाला आहे, त्यामुळेच ते वॉकओव्हर देण्याचा विचार करत आहेत. ते खेळले काय किंवा न खेळले काय, भारतासाठी हा सामना वॉकओव्हरच (विनासायास विजय) आहे. ते आले किंवा नाही आले तरी काही फरक पडत नाही. आशिया चषकात तर ते भारता विरुद्ध सर्व सामने खेळले होते.”

​पाकिस्तानचा संघ ‘ग्रुप ए’ मध्ये भारत, नामिबिया, नेदरलँड्स आणि अमेरिकेसोबत आहे. पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहेत, जे भारतासोबत या स्पर्धेचे सह-यजमानपद भूषवत आहेत. सलमान अली आगाच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाने गेल्या आठवड्यात मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्धची तीन सामन्यांची टी-२० मालिका ३-० अशी जिंकली होती, मात्र त्या मालिकेत ऑस्ट्रेलियाचे अनेक मुख्य खेळाडू खेळले नव्हते. बुधवारी आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या सराव सामन्यापूर्वी पाकिस्तानचा संघ सोमवारी श्रीलंकेत पोहोचला आहे.

​पाकिस्तान आपल्या मोहिमेची सुरुवात ७ फेब्रुवारीला नेदरलँड्स विरुद्ध करेल, त्यानंतर १० फेब्रुवारीला अमेरिका आणि १८ फेब्रुवारीला नामिबिया विरुद्ध त्यांचे सामने होतील. १५ फेब्रुवारीचा सामना न खेळण्याचा त्यांचा धक्कादायक निर्णय हा बांगलादेशच्या समर्थनासाठी असल्याचे मानले जात आहे. सुरक्षा कारणांमुळे भारतामध्ये खेळण्यास नकार दिल्यानंतर बांगलादेशला स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---