यावर्षी पार पडलेल्या टी२० विश्वचषकात भारतीय संघाचा प्रवास संपल्यानंतर रवी शास्त्रींचा संघासबोतचा मुख्य प्रशिक्षकाचा करारही संपला आहे. त्यांनी यापूर्वीच घोषित केले होती की, ते पुन्हा संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी इच्छूक नाहीत. मात्र, शास्त्री जास्त काळ क्रिकेटपासून लांब राहू शकतील, असे वाटत नाही. भारतीय संघासोबत मुख्य प्रशिक्षकाचा कार्यकाळ संपल्यानंतर रवी शास्त्री लेजेंड्स लीग क्रिकेटमध्ये सामील होणार आहेत.
शास्त्री पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये सुरू होणाऱ्या लेजेंड्स लीग क्रिकेटमध्ये आयुक्ताच्या रूपात सामील होणार आहेत.
रवी शास्त्रींचा भारतीय संघासोबतचा मुख्य प्रशिक्षकाच्या रूपातील प्रवास संपला असून त्यांच्या जागेवर भारतीय संघाचे माजी दिग्गज फलंदाज राहून द्रविड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जानेवारीमध्ये सुरू होणारी ही लीग पहिल्यांदाच खेळली जाणार आहे. यापूर्वी या लीगचा एकही हंगाम खेळला गेलेला नाही.
या लीगसाठी जबाबदारी स्वीकारल्यानंतर शास्त्री म्हणाले की, क्रिकेटसोबत जोडलेले राहणे चांगले वाटते, खासकरून खेळातील त्या दिग्गजांसोबत जे त्यांचे चॅम्पियन राहिले आहेत. लीग खूप मजेदार होणार आहे, असेही शास्त्रींनी सांगितले आहे.
या लीगमध्ये खेळणारे दिग्गज खेळाडू काहीच साध्य करू इच्छित नाहीत, पण तरीही या लीगमध्ये त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शास्त्री म्हणाले की, ‘मी तुम्हाला खात्री देतो की, हे पाहणे मनोरंजक असेल की, ते याला कसा न्याय देतात. मी या लीगमध्ये सहभागी होऊन खूप उत्साहीत आहे. हा एक अनोखा उपक्रम आहे आणि आम्हाला याचे भविष्य उज्ज्वल दिसत आहे.’
या लीगमध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड या देशांचे माजी खेळाडू खेळताना दिसणार आहेत. लीगमध्ये हे खेळाडू भारत, एशिया आणि जगातील इतर संघांसाठी खेळताना दिसतील. भारतीय संघाचे माजी फिजिओ एंड्रयू लीपस संचालकाच्या रूपात या लीगमध्ये सामील होतील.
महत्त्वाच्या बातम्या –
धन्यवाद आणि गुडबाय! सचिन बोलत होता अन् वानखेडेवर चाहते रडत होते…
‘देशातील क्रिकेट टिकवण्यासाठी आयपीएल आवश्यक’, रवी शास्त्रींचे मोठे भाष्य
‘कर्णधाराने प्रत्येकाची भूमिका सुनिश्चित करावी’, रोहितच्या नेतृत्त्वाबद्दल केएल राहुलची प्रतिक्रिया