---Advertisement---

रवी शास्त्रींचा धक्कादायक खुलासा! म्हणाले, ‘भारतातील जळणाऱ्या लोकांना वाटायचं की, मी…’

On: मंगळवार, एप्रिल 26, 2022 5:14 PM
Ravi-Shastri
---Advertisement---

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे नवीन क्रिकेट संचालक रॉबर्ट की यांना भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनी सल्ला दिला. यावेळी ते म्हणाले की, इंग्लंडच्या या माजी सलामीवीर फलंदाजाला ड्यूक चेंडूप्रमाणे जाड चमडी विकसित करण्याची आवश्यकता आहे. ज्याप्रकारे त्यांनी जळणाऱ्या लोकांचा सामना करण्यासाठी केली होती. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत शास्त्रींनी मोठी खुलासादेखील केला आहे.

ते म्हणाले की, भारतात जळणाऱ्या लोकांचा गट होता, ज्यांना वाटायचे की, मी अयपशी ठरलो पाहिजे.

रवी शास्रींप्रमाणे (Ravi Shastri) रॉबर्ट हेदेखील दीर्घकाळापासून प्रतिष्ठित समालोचक राहिले आहेत. त्यांच्याकडे कोणतीही प्रशिक्षणाची पदवी नाहीये. शास्त्री म्हणाले की, “माझ्याकडेही कोणतीही प्रशिक्षणाची पदवी नव्हती. लेव्हल एक? लेव्हल दोन? आणि भारतासारख्या देशात तुमच्याशी जळणाऱ्या लोकांचा नेहमीच एक गट असतो, ज्यांना वाटते की, तुम्ही अपयशी ठरला पाहिजे. माझी जाड चमडी (लोकांकडे जास्त लक्ष न देणारी) आहे, तुम्ही ज्या ड्यूक चेंडूचा वापर करता, त्यापेक्षाही जाड.”

शास्त्रींच्या हवाल्याने माध्यमांनी सांगितले की, “तुम्हाला याचा आधार घ्यावा लागतो. रॉबर्ट जेव्हा काम करायला सुरुवात करेल, तेव्हा त्याला ही गोष्ट विकसित कशी करायची, हे शिकावे लागेल. कारण, प्रत्येक दिवशी तुमच्या कामाबाबत चर्चा होतील. मला आनंद आहे की, केंटसोबत खेळण्यादरम्यान त्याला नेतृत्वाचा अनुभव आहे. कारण, खेळाडूंशी संवाद साधण सर्वोत्तम असते.”

भारतीय संघासोबत काम करण्याच्या आपल्या अनुभवाच्या आधारावर शास्त्रींचा असा विश्वास आहे की, क्रिकेट जगतात सर्व राष्ट्रीय संघ जवळपास एकाच पद्धतीने काम करतात. शास्त्री संघांच्या संस्कृतीवर जोर देत म्हणाले की, ऑस्ट्रेलियामध्ये सलग दोन मालिका जिंकण्यादरम्यान हा भारतीय संघाचा महत्त्वाचा भाग होता.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

ते म्हणाले की, “यावरून समजते की, आपल्याला कसे खेळायचे आहे. आक्रमक होऊन आणि विरोधी संघाला कोणतीही संधी न देणे, फिटनेसचा स्तर, वेगवान गोलंदाजांची फळी तयार करणे, जे परदेशात २० विकेट घेऊ शकतील. तसेच, हे तुमच्या वागण्याशी जोडलेले आहे. खासकरून जेव्हा तुम्ही ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळता. मी खेळाडूंना म्हणले की, जर तुम्हाला कुणी अपशब्द वापरत असेल, तर तुम्ही तीन अपशब्द परत करा. २ आपल्या भाषेत आणि १ त्यांच्या भाषेत.”

शास्त्री २०१४ पासून २०२१पर्यंत एक वर्ष सोडून बाकी सर्व वर्षे भारतीय संघाचे क्रिकेट संचालक राहिले. या एक वर्षासाठी अनिल कुंबळेला मुख्य प्रशिक्षक म्हणून नेमण्यात आले होते.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

‘धोनी थाला, कोहली किंग आहे आणि शिखर?’, भारतीय दिग्गजाने उपस्थित केला प्रश्न

‘कॅप्टन कूल’ धोनीच्या पत्नीचा चढला पारा! ट्वीट करत झाप झाप झापलं, जाणून घ्या प्रकरण

खरंच भाऊ-भाऊ आहेत का ऋषी अन् शिखर धवन? वाचा काय आहे नेमकं त्यांचं नातं

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---