Thursday, May 19, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘कॅप्टन कूल’ धोनीच्या पत्नीचा चढला पारा! ट्वीट करत झाप झाप झापलं, जाणून घ्या प्रकरण

'कॅप्टन कूल' धोनीच्या पत्नीचा चढला पारा! ट्वीट करत झाप झाप झापलं, जाणून घ्या प्रकरण

April 26, 2022
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
MS-Dhoni-And-Sakshi-Dhoni

Photo Courtesy: Instagram/sakshisingh_r


सध्या उन्हाळा सुरू असल्यामुळे सर्वत्रच विजेचा अतिवापर होताना दिसत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी विजेच्या समस्या निर्माण होत आहेत. याचा फटका फक्त सामान्य नागरिकच नाहीत, तर मोठ-मोठ्या सेलिब्रिटींनाही बसत आहे. अशात भारतीय संघ आणि चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार एमएस धोनीची पत्नी साक्षी धोनीने झारखंडमधील विजेच्या संकटाबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे. तिने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर याबाबत प्रश्न विचारला आहे.

एमएस धोनी (MS Dhoni) आणि त्याची पत्नी साक्षी (Sakshi Dhoni) रांचीतील त्यांच्या फार्म हाऊसवर राहतात. धोनी सध्या आयपीएल २०२२मध्ये खेळण्यासाठी महाराष्ट्रात आहे. अशात साक्षीने एक कर भरणारी व्यक्ती म्हणून आपली जबाबदारी पार पाडत आहे. तिने या विजेच्या संकटाबद्दल प्रश्न उपस्थित करत ट्वीट केले आहे. ती आपल्या ट्वीटमध्ये म्हणते की, “झारखंडची एक करदाता असल्याने मला हे जाणून घ्यायचे आहे की, येथे इतक्या वर्षांपासून वीज संकट का आहे? वीज बचतीसाठी आम्ही आमची भूमिका गांभीर्याने घेत आहोत.”

As a tax payer of Jharkhand just want to know why is there a power crisis in Jharkhand since so many years ? We are doing our part by consciously making sure we save energy !

— Sakshi Singh 🇮🇳❤️ (@SaakshiSRawat) April 25, 2022

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

यापूर्वीही साक्षीने केले होते ट्वीट
वीज संकटावर साक्षी धोनीने प्रश्न उपस्थित करण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. तिने यापूर्वीही वीज संकटाबद्दल मत मांडले होते. तिने १९ सप्टेंबर, २०१९ रोजी ट्वीट केले होते. त्यात ती म्हणाली होती की, “रांचीमध्ये लोक दररोज विजेच्या संकटाचा सामना करतात. दररोज ४ ते ७ तास वीज कापली जाते. आज १९ सप्टेंबर, २०१९ दिवशीही ५ तास वीज कापली आहे. आज वातावरणही चांगले आहे आणि कोणता सणही नाहीये. मला आशा आहे की, संबंधित विभाग यावर लक्ष देतील.”

#ranchi pic.twitter.com/OgzMHoU9OK

— Sakshi Singh 🇮🇳❤️ (@SaakshiSRawat) September 19, 2019

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

झारखंड वीज वितरण निगम लिमिटेडने सोमवारी (२५ एप्रिल) असा दावा केला होता की, त्यांनी वीज वितरणात खूप सुधारणा केली आहे. तसेच, राज्याची राजधानी रांचीतील लोकांना १८ ते २० तास अखंड वीज मिळेल.

उष्णतेमुळे राज्याची मागणी २५०० मेगावॅटपेक्षा जास्त आहे. यासाठी, संपूर्ण जबाबदारी टीव्हीएनएलच्या दोन युनिट्सवर आहे, जे सध्या सुमारे ३५० मेगावॅट वीज निर्मिती करत आहेत. २३ एप्रिल रोजी आधुनिक वीज युनिटमध्ये उत्पादनावर परिणाम झाल्याने झाल्याने हे संकट वाढले आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

‘त्याचीच कमी भासतेय’, चेन्नईच्या ६ व्या पराभवानंतर कर्णधार जडेजाने सांगितली संघातील कमजोरी

शिखर धवनचे विक्रमी अर्धशतक! चेन्नईविरुद्ध ८८ धावा ठोकत विराट, रोहितच्या पंक्तीत स्थान

IPL| चेन्नईविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवण्यात पंजाब दुसऱ्या क्रमांकावर, यादीत ‘हा’ संघ अव्वल


ADVERTISEMENT
Next Post
Shikhar-Dhawan

'धोनी थाला, कोहली किंग आहे आणि शिखर?', भारतीय दिग्गजाने उपस्थित केला प्रश्न

Ravindra-Jadeja-And-Shikhar-Dhawan

शिखर धवनचा स्कूप शॉट बघून भले-भले पडले गार, कर्णधार जडेजाही झाला हैराण

Ravi-Shastri

रवी शास्त्रींचा धक्कादायक खुलासा! म्हणाले, 'भारतातील जळणाऱ्या लोकांना वाटायचं की, मी...'

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.