जगातील अव्वल दर्जाची मानली जाणारी टी-20 क्रिकेट लीग आयपीएलच्या 14 व्या पर्वाला दोनच दिवसात सुरूवात होणार आहे. तत्पुर्वी या पर्वाच्या अगोदर ज्येष्ठ खेळाडू आणि क्रिकेटतज्ञ आपल्या या आयपीएलमध्ये काय काय पहायला मिळू शकते याबद्दल अंदाज बांधत आहेत. तर यामध्ये भारतीय संघाचे माजी सलामीवीर आणि क्रिकेट समालोचक आकाश चोप्रा यांनी आगामी आयपीएल 2021 बद्दल भविष्यवाणी केली आहे.
त्यांनी आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी आयपीएलच्या इतिहासातील 5 अव्वल फलंदाजांची निवड केली आहे. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे, या आयपीएल लीगदरम्यान चौकार आणि षटकारांची चौफेर आतीषबाजी करत चाहत्यांचे मनोरंजन करणाऱ्या ख्रिस गेल, आंद्रे रसेल आणि महेंद्रसिंग धोनींसारख्या स्फोटक फलंदाजांना त्यांनी आपल्या यादीत समाविष्टच केले नाही.
चोप्रा यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर व्हिडिओ शेअर केला असून यामध्ये आयपीएल इतिहासातील सर्वोत्कृष्ट 5 फलंदाजांना निवडले आहे. त्यामध्ये त्यांनी आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीला प्रथम स्थान दिले आहे. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली हा अव्वल असून या स्पर्धेत त्याच्या नावे अनेक मोठे विक्रमसुद्धा आहेत. आकाश चोप्रा यांनी विराट कोहलीवरती स्तुतीसुमने उधळत जोरदार कौतुक केले आहे. तसेच या यादीत आरसीबीच्या एबी डिव्हिलियर्सचेही नाव आहे.
डिव्हिलियर्सचे कौतुक करताना त्यांनी म्हटले आहे की, “आरसीबीचा हा दिग्गज फलंदाज दरवर्षी अव्वल क्रमांकात न खेळताही आपल्या कामगिरीने प्रेक्षकांची मने जिंकण्याचे काम करतो आणि बऱ्याच धावाही करतो.”
त्याचबरोबर या यादीमध्ये त्यांनी सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार आणि ऑस्ट्रेलियन सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरला तीन नंबरचे स्थान दिले आहे. हा खेळाडू प्रत्येक हंगामात सातत्याने चमकदार कामगिरी करून आपल्या संघाला यशस्वी करण्यात मोलाचे योगदान देत असतो. त्यामुळे त्याचा संघ दरवर्षी आश्चर्यजनक कामगिरी करत असतो म्हटले त्यांनी आहे. त्याचबरोबर त्यांनी सुरेश रैनाला या यादीत चौथ्या क्रमांकावर ठेवले आहे. जो या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा काढण्याच्या बाबतीत दुसर्या क्रमांकावर आहे.
तसेच त्यांनी आयपीएलचा सर्वाधिक यशस्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला या यादीत शेवटचे आणि पाचवे फलंदाज म्हणून निवडले आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, रोहित शर्माची आयपीएलमधील धावांची आकडेवारी जरी एवढी मोठी नसली, तरी त्याने आयपीएल मध्ये वैयक्तिक 5000 हून अधिक धावा केल्या आहेत. तसेच यंदाही तो स्फोटक फलंदाजी करताना दिसू शकतो, असा त्यांना विश्वास आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
एक नारळ दिलाय… मुंबईकरांनी मराठी गाण्यावर धरला ताल; पाहा त्यांच्या झक्कास डान्सचा व्हिडिओ
जबराट! ‘या’ धुरंधरांनी, पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार मारत आयपीएल कारकिर्दीचा केला श्रीगणेशा
आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावणारे ३ भारतीय, रोहित नव्हे ‘हा’ धुरंधर अव्वलस्थानी