भारतीय क्रिकेट संघाचे सर्वात वयस्कर म्हणून दत्ताजीराव गायकवाड यांची ओळख होती. माजी क्रिकेटपटू भारतीय संघाचे कर्णधार देखील राहिले. मंगळवारी (13 फेब्रुवारी) त्यांनी या जगाचा निरोप घेतला. वृद्धापकाळाने त्याने निधन झाल्याचे सांगितले जात आहे. दत्ताजीराव गायकवाड यांनी 1952 मध्ये लीड्स याठिकाणी इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. तर कारकिर्दीतील शेवटचा सामना त्यांनी चेन्नईमध्ये पाकिस्तानविरुद्ध 1961 साली खेळला.
भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि सर्वात वयस्कर क्रिकेटपटू यांचे निधन वयानुसार होणाऱ्या आजारांमुळे झाले आहे. त्यांनी भारतीय संघासाठी सलामीवीर फलंदाज म्हणून भूमिका पार पाडली होती. राष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षक अंशुमान गायकवाड यांचे ते वडील होते. वयाच्या 95व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतीय क्रिकेट नियमक मंडळ म्हणजेच बीसीसीआयच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून दत्ताजीराव गायकवाड यांचे कुटुंब आणि निकटवर्तीयांप्रती शोक व्यक्त केला आहे.
दत्ताजीराव गायकवाड यांच्या कुटुंबातील एका सदस्याने माध्यमांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. माध्यमांतील वृत्तांनुसार गायकवाड कुटुंबातील हा सदस्य म्हणाला, “मागच्या 12 दिवसांपासून ते बडोद्यातील एका रुग्णालयात आयसीयूमध्ये भरती होते. जीवण आणि मरण्यासाठी त्यांनी झुंज दिली. पण आज (मंगळवार) अखेर त्यांनी शेवटचा श्वास घेतला.” गाकवाड यांनी 1952 ते 1961 यादरम्यान 11 कसोटी सामने खेळले. 1959 मध्ये त्यांनी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता, तेव्हा त्यांनी कर्णधाराची भूमिका देखील पार पाडली होती.
The BCCI expresses its profound grief at the passing away of Dattajirao Gaekwad, former India captain and India’s oldest Test cricketer. He played in 11 Tests and led the team during India’s Tour of England in 1959. Under his captaincy, Baroda also won the Ranji Trophy in the… pic.twitter.com/HSUArGrjDF
— BCCI (@BCCI) February 13, 2024
देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांनी रजणी ट्रॉफी स्पर्धेत 1945 ते 1961 यादरम्यान बडोदा संघाचे प्रतिनिधित्व केले. 47.56च्या सरासरीने 3139 धावा त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये केल्या. यात 14 शतकांचाही समावेश होता. 1959-60 हंगामात गायकवाड यांनी महाराष्ट्र संघाविरुद्ध 249 धावांची खेळी केली होती. ही त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी देखील ठरली होती.
2016 मध्ये दत्तजीराव गायकवाड भारताचे सर्वात वयस्कर क्रिकेटपटू बनले होते. त्यांच्या आधी दीपक शोधन भारताचे सर्वात वयस्कर क्रिकेटपटू होते. माजी फलंदाज शोधन यांनी वयाच्या 87 व्या वर्षी अहमदाबादमध्ये शेवटचा श्वास घेतला होता. (Former Indian cricketer Dattajirao Gaikwad passed away)
महत्वाच्या बातम्या –
IND vs ENG । सरफराज खानचे कसोटी पदार्पण होणार! राजकोट कसोटीत चमकणार युवा खेळाडूची नशीब
U19 WC टीम ऑफ द टुर्नामेंटची घोषणा, एक-दोन नाही तर चार भारतीयांना मिळाले स्थान