---Advertisement---

IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध तिसऱ्या नंबरवर कोण करणार फलंदाजी? ‘या’ माजी क्रिकेटरने सुचवले नाव!

On: गुरूवार, जून 19, 2025 8:55 AM
---Advertisement---

India vs England Test Series: भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेला उद्या, शुक्रवारपासून (20 जून) सुरुवात होणार आहे. पण त्याआधीच विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्माच्या (Rohit Sharma) जागी कोण फलंदाजी करणार, याबाबत उत्सुकता कायम आहे. याचदरम्यान, माजी भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) नंबर तीनवर कोणाला फलंदाजी करावी, याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. दिनेश कार्तिकला वाटते की, यावर्षी आयपीएलमध्ये (IPL) 759 धावा काढणाऱ्या साई सुदर्शनने (Sai Sudharsan) भारतासाठी नंबर 3 वर फलंदाजी करावी. (Sai Sudharsan Number 3)

भारताच्या बॅटिंग ऑर्डरवर बोलताना दिनेश कार्तिक म्हणाला की, त्याला वाटते की साई सुदर्शनने 3 नंबरवर फलंदाजी करावी. या संघात अभिमन्यू ईश्वरन (Abhimanyu Easwaran) देखील आहे, परंतु पहिल्या कसोटीत साई सुदर्शनला संधी मिळू शकते असे मानले जात आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीमुळे फलंदाजी क्रमात बदल झाले आहेत. कार्तिकने यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि केएल राहुलला (KL Rahul) त्यांच्या मागील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील (BGT) यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी पाठिंबा दिला आहे.

कार्तिकला वाटते की, 7 वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतलेल्या करुण नायरने (Karun Nair) सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करावी. त्याच्या मते, नितीश कुमार रेड्डीच्या जागी पहिल्या कसोटीत शार्दुल ठाकूरचा (Shardul Thakur) समावेश केला जाईल. त्याने कर्णधार शुबमन गिल (Shubman Gill) आणि उपकर्णधार रिषभ पंतला (Rishabh Pant) मधल्या फळीत ठेवले आहे. त्याच्या टॉप 8च्या यादीत यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुबमन गिल, रिषभ पंत, करुण नायर, रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर यांचा समावेश आहे. रिषभ पंतने पत्रकार परिषदेत याची पुष्टी केली आहे की, कर्णधार गिल चौथ्या क्रमांकावर आणि तो पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करेल. (Dinesh Karthik Batting Order)

दिनेश कार्तिक म्हणाला, “यशस्वी असा खेळाडू आहे, जो अशा आव्हानांसाठी तयार आहे. तिसऱ्या क्रमांकावर साई सुदर्शन, माझ्या मते मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आणि आयपीएलमध्ये त्याला मिळालेल्या संधी त्याने चांगल्या प्रकारे साधल्या आहेत, शानदार कामगिरी केली आहे. तो ती कामगिरी रेड बॉल क्रिकेटमध्येही बदलू शकतो का?” (Dinesh Karthik On Team India Batting Order)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---