इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे.या मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत राहिला होता. या सामन्यात इंग्लंड संघाकडून ओली रॉबिन्सन याने पदार्पण केले होते. तसेच या सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ओली रॉबिन्सनला निलंबित करण्यात आले आहे.
रॉबिन्सनने २०१२ -१३ मध्ये वर्णद्वेषी ट्विट केले होते, जे काहीदिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यामुळे ईसीबीने त्याला या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी रॉबिन्सनला पाठिंबा दिला होता. अशातच माजी भारतीय क्रिकेटपटूंनी ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर टीका केली आहे.
ओली रॉबिन्सनने आपल्या पहिल्या कसोटी सामन्यात ७ गडी बाद केले होते. परंतु हा सामना झाल्यानंतर त्याला ईसीबीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित करण्याचा निर्णय घेतला होता. याचे कारण असे की, ओलीने १० वर्षांपूर्वी वर्णद्वेषी आणि लैंगिकतावादी ट्वीट केले होते, जे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. याची दखल घेत ईसीबीने टोकाची भूमिका घेतली होती.
पण रॉबिन्सनला पाठिंबा देत पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ट्विट करत म्हटले होते की, “त्याने जेव्हा ते ट्विट केले होते तेव्हा लहान होता. यासाठी त्याला इतकी मोठी शिक्षा मिळायला नको होती.” बोरिस जॉन्सन यांच्या भूमिकेवर क्रिकेटपटू फारूख इंजियनियर यांनी टीका केली आहे.
फारूख इंजिनियर यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “मी वृत्तपत्रात बोरिस जॉन्सन यांच्याबद्दल वाचले आहे. मला वाटतं की पंतप्रधानांनी या प्रकरणात हस्तक्षेप करणे पूर्णपणे मूर्खपणा आहे. त्याला (रॉबिन्सन) शिक्षा देऊन ईसीबीने अगदी योग्य केले आहे. त्याने चूक केली होती आणि त्याला शिक्षा मिळायलाच हवी होती.”
तसेच ते पुढे म्हणाला की, “ही खरंच एक लज्जास्पद गोष्ट आहे. तुम्ही म्हणताय की तो किशोर वयाचा होता. परंतु त्याने जेव्हा ट्विट केले तेव्हा तो १८ वर्षांचा होता. १८ वर्षांचा व्यक्ती समजूतदार असतो. जर या गोष्टींमध्ये तो आणखी पुढे गेला असता तर गोष्टी आणखी वाईट झाल्या असत्या. यावर त्यांनी कठोर कारवाई केली नाही तर लोक आशियाई वंशाच्या लोकांविरूद्ध अशा गोष्टी करत राहतील.”
महत्त्वाच्या बातम्या –
काय सांगता!! एकाच संघातून खेळले होते ६ भाऊ? पाहा कोणी कशी कामगिरी केली होती
‘या’ मोठ्या टी२० लीगला जुलैमध्ये होणार सुरुवात, २२ ऑगस्टपर्यंत चालणार स्पर्धा
भारतीय चाहत्यांची खिल्ली उडवणे मॉर्गन-बटलरला पडणार महागात, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून होणार निलंबित?





