गुरुवारी (दि. २१ एप्रिल) इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या हंगामातील मोठा सामना खेळला जाणार आहे. हा सामना आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात होणार आहे. हा सामना नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडिअममध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने मोठे वक्तव्य केले आहे. तो असे म्हणाला आहे की, मुंबई आणि चेन्नईमध्ये खेळला जाणारा सामना हा भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यापेक्षा कमी नसेल. विशेष म्हणजे, हरभजन मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघांकडून आयपीएल खेळला आहे.
आयपीएल २०२२मध्ये मुंबई आणि चेन्नई (Mumbai Indians vs Chennai Super Kings) संघाने खूपच खराब कामगिरी केलीये. आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ गुणतालिकेत सर्वात खाली आहेत. मुंबईने आतापर्यंत खेळलेल्या ६ सामन्यांपैकी ६ सामन्यात पराभवाचा सामना केला आहे. दुसरीकडे, चेन्नईने खेळलेल्या ६ सामन्यांपैकी फक्त १ सामना जिंकला आहे. गुणतालिकेबद्दल बोलायचं झालं, तर चेन्नई २ गुणांसह नवव्या क्रमांकावर आहे, तर मुंबई संघ दहाव्या स्थानावर आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
आजचा सामना भारत- पाकिस्तानपेक्षा नसेल कमी
माध्यमांशी बोलताना हरभजन सिंग (Harbhajan Singh) म्हणाला की, “जेव्हा मी मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममध्ये १० वर्षे बसल्यानंतर चेन्नईची जर्सी घातली, तेव्हा मला विचित्र वाटले. माझ्यासाठी दोन्ही संघ खूप खास राहिलेत. या दोन्ही संघांमध्ये इतकी जास्त प्रतिस्पर्धा आहे की, सामन्यादरम्यान भारत- पाकिस्तान सामन्याची जाणीव होते. सामन्यावेळी संघाच्या भावना खूपच वाढलेल्या असतात.”
दोन्ही संघ किताब जिंकण्यात राहिलेत यशस्वी
हरभजन हा असा क्रिकेटपटू आहे, जो मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघांच्या किताब जिंकतानाच्या सामन्यात सामील राहिला आहे. तो २००८पासून २०१७ पर्यंत मुंबई इंडियन्सचा भाग राहिलाय. यादरम्यान त्याने मुंबईला आयपीएलचे किताब जिंकण्यात योगदान दिले आहे. यानंतर २०१८मध्ये त्याने चेन्नई संघाची साथ धरली. त्याने चेन्नईला त्याच वर्षी आयपीएलमध्ये पुनरागमन करताना आयपीएलचा किताब जिंकून दिला होता.
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघातील सामन्याला गुरुवारी (दि. २१ एप्रिल) भारतीय प्रमाणवेळेनुसार ७.३० वाजता सुरुवात होईल. या सामन्यात दोन्ही संघ विजय मिळवण्याचा प्रयत्न करतील.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कर्णधार मयंकने ‘या’ ३ सुधारणा केल्या तरंच बरं, नाहीतर पंजाब संघ होऊ शकतो प्लेऑफमधून बाहेर
आयपीएलमध्ये ‘या’ विक्रमांमध्ये ‘नंबर वन’ आहे डेव्हिड वॉर्नर, अन्य कोणी आसपासही नाहीत






