महिला क्रिकेटला चांगले दिवस आले आहेत. पुरुषांच्या आयपीएलप्रमाणे आता महिला प्रीमिअर लीग स्पर्धाही खेळवली जाणार आहे. यावेळी महिला प्रीमिअर लीगचा पहिलाच हंगाम असणार आहे. या हंगामाला मार्चमध्ये सुरुवात होणार आहे. त्यापूर्वीच महिला आयपीएल संघांची बोली लावली गेली आहे. त्यातून 5 संघ निवडले गेले आहेत. महिला आयपीएल फ्रँचायझी सध्या त्यांच्या सपोर्ट स्टाफमध्ये आजी-माजी दिग्गज महिला खेळाडूंना घेताना दिसत आहेत. सर्वप्रथम भारतीय संघाची माजी कर्णधार मिताली राज हिला गुजरात जायंट्स संघाने मार्गदर्शक म्हणून सामील केले. त्यात आता भारताची माजी दिग्गज गोलंदाज झूलन गोस्वामी हिचे नावही सध्या चर्चेत आहे.
माजी भारतीय क्रिकेटपटू झूलन गोस्वामी (Jhulan Goswami) महिला प्रीमिअर लीग (Womens Premier League) स्पर्धेत मुंबई फ्रँचायझीमध्ये मार्गदर्शक आणि गोलंदाजी प्रशिक्षक होण्यासाठी सज्ज झाली आहे. तिने लॉर्ड्समध्ये तिचा शेवटचा सामना खेळल्यानंतर सप्टेंबर 2022मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अधिकृतरीत्या या महिन्याच्या सुरुवातीला महिला प्रीमिअर लीगच्या सुरुवातीची घोषणा केली. तसेच, 17 पैकी 5 बोली लावणाऱ्यांना स्पर्धेत एक फ्रँचायझीसाठी यशस्वीरीत्या बोली लावण्यात यश मिळवले. त्यात इंडियाविन स्पोर्ट्स प्रा. लिमिटेडने 912.99 कोटी रुपयात मुंबईची फ्रँचायझी मिळवली. कारण, या प्रक्रियेसाठी 4669.99 कोटी रुपयांची एकूण बोली लागली आहे.
अद्याप मुंबई फ्रँचायझीद्वारे याची अधिकृत घोषणा झाली नाहीये, परंतु माध्यमांतील वृत्तांनुसार, एका रिपोर्टमध्ये झूलन गोस्वामीला मुंबई संघाच्या कोचिंग युनिटमध्ये सामील करण्याचा खुलासा करण्यात आला आहे.
Jhulan Goswami will be the Mentor of Mumbai Indians in WPL. (Source – Espn Cricinfo)
— Johns. (@CricCrazyJohns) February 1, 2023
गांगुलींकडून पुष्टी
बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनीही याची पुष्टी केली आहे. ते आता संघाचे संचालक म्हणून इंडियन प्रीमिअर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा भाग असतील. ते म्हणाले, “झूलन मुंबईला गेली. आम्ही तिला ऑफर दिली होती, पण ती मुंबईला जात आहे.”
यापूर्वी असे वृत्त होते की, झूलन आणि मिताली दोन्ही पहिल्या महिला आयपीएल हंगामासाठी मैदानावर परतण्यासाठी इच्छूक होत्या. दिल्ली कॅपिटल्सची नजर दीर्घकाळापासून झूलनवर होती. मागील वर्षीपासून दिल्लीने झूलनला आगामी आयपीएल 2023 हंगामासाठी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून घेण्यासाठी रडारवर ठेवले आहे.
एकीकडे झूलन मुंबई फ्रँचायझीशी जोडली गेली आहे, तसेच दुसरीकडे तिची माजी सहकारी खेळाडू मिताली राज (Mithali Raj) हिला अधिकृतरीत्या महिला आयपीएल फ्रँचायझी गुजरात जायंट्सची मार्गदर्शक म्हणून संघात घेतले आहे. (former indian cricketer jhulan goswami joins mumbai as bowling coach and mentor for the womens premier league)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Video: सभ्य लोकांच्या खेळात पाकिस्तानी गोलंदाजाचे लाजीरवाणे कृत्य; आधी फलंदाजाला दिला धक्का अन् मागून…
कसोटी मालिकेपूर्वीच ऑस्ट्रेलियाकडून खळबळजनक विधानांचा मारा; भारतावर लावला ‘विश्वासघाता’चा आरोप?