---Advertisement---

मोठी बातमी! माजी भारतीय क्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धूंना तुरुंगवासाची शिक्षा

---Advertisement---

माजी भारतीय क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांना मोठा झटका बसला आहे. त्यांना सर्वोच्च न्यायालयाने ३४ वर्षे जुन्या रोड रेज (रस्त्यावर भांडण) प्रकरणात एका वर्षासाठी कठोर कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सिद्धू यांना यापूर्वी या प्रकरणी दिलासा मिळाला होता. परंतु रोड रेज प्रकरणी ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता, त्याच्या कुटुंबीयांनी न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. आता यावर सुनावणी करताना सिद्धूंना एका वर्षासाठी तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

आयपीसीचा कलम ३२३ अंतर्गत, सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांना ३४ वर्षे जुन्या केसमध्ये शिक्षा देण्यात (Navjot Sidhu Imprisonment) आली आहे. या कलमामध्ये आरोपीला एका वर्षासाठी तुरुंगवासाची शिक्षा होते. माध्यमांतील वृत्तानुसार, सिद्धूंना आता पंजाब पोलिस आपल्या ताब्यात घेईल.

नेमके काय आहे प्रकरण?
सिद्धू यांचे रोड रेजचे हे प्रकरण २७ डिसेंबर १९८८ चे आहे. त्यांच्यावर ३४ वर्षांपूर्वी पटियाला येथे रस्त्यावर झालेल्या विवादात गुरनाम सिंग नावाच्या व्यक्तीला मारहाण करण्याचा आरोप आहे. गुरनाम सिंग यांचा या मारहानीनंतर रुग्णालयात मृत्यू झाला होता. पटियाला येथे कारने जात असताना सिद्धू गुरनाम सिंग या वृद्धासोबत भिडले होते.

रागाच्या भरात सिद्धूंनी गुरनाम यांना मुक्का मारला होता, ज्यानंतर त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पटियाला पोलिसांनी सिद्धू आणि त्यांचे मित्र रूपिंदर सिंग यांच्याविरोधात सदोष हत्येचा गुन्हा दाखल केला होता. परंतु पुराव्यांच्या अभावामुळे १९९९ मध्ये कनिष्ठ न्यायालयाने त्यांना निर्दोष असल्याचे सांगत या प्रकरणातून त्यांची सुटका केली होती. परंतु त्यानंतर पिडीताच्या कुटुंबियांनी उच्च न्यायालयाकडे धाव घेतली.

या प्रकरणी उच्च न्यायालयाने २००६ मध्ये सिद्धूंना ३ वर्षांसाठी कारावासाची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणाला सिद्धूंनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तिथे त्यांना दिलासा मिळाला आणि सुप्रीम कोर्टाने २०१८ मध्ये एक हजार रूपयांचा दंड करत या प्रकरणातून बरे केले. मात्र त्यानंतर गुरनाम सिंग यांच्या नातेवाईकांनी उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली. त्यानंतर आता उच्च न्यायालयाने या प्रकरणी आपला निर्णय दिला आहे, ज्यामध्ये सिद्धूंना एका वर्षाची शिक्षा देण्यात आली आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---