---Advertisement---

कोरोनामुळे माजी भारतीय अष्टपैलू हरपला, तब्बल १४८ विकेट्स घेणारे जडेजा कालवश

On: रविवार, मे 16, 2021 1:43 PM
---Advertisement---

भारत देशात सध्या कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. आतापर्यंत कित्येक मोठमोठ्या व्यक्तींना कोरोनामुळे आपले जीव गमवावा लागला आहे. रविवारी (१६ मे) माजी भारतीय अष्टपैलू आणि बीसीसीआय सामना रेफरी राजेंद्रसिंग जडेजा यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते ६६ वर्षांचे होते. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने यासंबंधी माहिती दिली आहे.

सौराष्ट्र संघाचे माजी क्रिकेटपटू जडेजा यांच्या निधनानंतर क्रिकेटविश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने (एससीए) त्यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त करत म्हटले आहे की, ‘एससीएतील प्रत्येक व्यक्तीला राजेंद्रसिंग जडेजा यांच्या मृत्यूच्या बातमीने दुख झाले आहे. ते सौराष्ट्र संघाचे लक्षणीय कामगिरी करणारे क्रिकेटपटू होते. कोविड-१९ विरुद्ध काही दिवसांची झुंज दिल्यानंतर अखेर आज ते स्वर्गवासी झाले आहेत.’

जडेजा यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व करण्याची संधी मिळाली नाही. परंतु त्यांनी देशांतर्गत स्तरावर सौराष्ट्र संघाचे नाव गाजवले. सौराष्ट्र संघाकडून ५० प्रथम श्रेणी सामने खेळताना २.६५ च्या इकोनॉमी रेटने १३४ विकेट्स घेतल्या होत्या. सोबतच १५३६ धावाही बनवल्या होत्या. अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये ११ सामने खेळताना १४ विकेट्स आणि १०४ धावांचीही खात्यात नोंद केली होती.

क्रिकेटच्या सर्व स्वरुपातून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी सामना रेफरी क्षेत्रात उरतण्याचा निर्णय घेतला होता. ५३ प्रथम श्रेणी, १८ अ दर्जाचे सामने आणि ३४ ट्वेंटी ट्वेंटी सामन्यात त्यांनी सामना रेफरीची भूमिका साकारली होती. याबरोबरच ते सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे निवडकर्ता, प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापक राहिले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

WTC फायनलपुर्वी ‘या’ किवी फलंदाजाचा दणका, सलग दुसरे शतक झळकावत टीम इंडियाला दिले आव्हान

सध्याचा दमदार फॉर्म अन् भारताविरुद्धची शानदार कामगिरी, कसोटी मालिकेत इंग्लंडचा ‘हा’ खेळाडू घालणार धुमाकूळ!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---