भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात, भारतीय संघाला ८ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांना न्यूझीलंडच्या फलंदाजांना बाद करण्यात अपयश आले होते. त्यामुळे भारतीय गोलंदाजांवर टीकांचा वर्षाव केला जात आहे. अशातच माजी भारतीय क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांनीदेखील भारतीय गोलंदाजांवर जोरदार टीका केली आहे.
या मोठ्या सामन्यात, न्यूझीलंड संघातील गोलंदाजांनी योग्य लाईन आणि लेंथने गोलंदाजी करत भारतीय फलंदाजांना अडचणीत टाकले होते. तर दुसरीकडे भारतीय गोलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले होते. त्यामुळे माजी भारतीय क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांनी भारतीय गोलंदाजांच्या गोलंदाजीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. (Former Indian cricketer Roger binny criticized Indian bowlers)
रॉजर बिन्नी यांनी म्हटले की, “रविवारी (तिसरा दिवस, २० जून) भारतीय गोलंदाजांना गोलंदाजी करताना पाहिले तेव्हा जाणवले की, ही इंग्लंडमध्ये गोलंदाजी करण्याची पद्धतच नव्हती. हे अपमानास्पद होते. विरोधी संघाने आपल्या विरुद्ध काय केले? हे कुठल्या प्रकारचे प्रदर्शन होते? ते एक कसोटी सामना खेळत होते. त्यांना मोठमोठे शॉट खेळायचे होते. त्यामुळे तुम्ही जितकी शॉर्ट गोलंदाजी कराल तितकाच चेंडू स्पिन करेल. तुम्हाला जर फलंदाजाला बाद करायचं असेल तर, आक्रमण करावे लागते. रक्षात्मक गोलंदाजी करून काही होत नाही.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “भारतीय गोलंदाज केवळ त्यांना थांबवण्यासाठी गोलंदाजी करत होते. इंग्लंडमध्ये एका कसोटी सामन्यात त्यांनी ज्याप्रकारे गोलंदाजी केली आहे. ते पाहून मी आश्चर्यचकित झालो होतो. विरोधी संघ तुम्हाला सीम चेंडूंचा मारा करत होते.तुम्हाला फक्त, त्यांना त्यांच्या पद्धतीने गोलंदाजी करताना पाहायचे होते. परंतु तुम्हाला वरती गोलंदाजी करायची होती.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “महत्त्वाचे म्हणजे भारतीय संघातील गोलंदाज नवीन नव्हते, तुम्ही फक्त बसून त्यांची गोलंदाजी पाहत होते. तुम्ही अशाच सामन्यांतून नवनव्या गोष्टी शिकत असता. भारतीय गोलंदाजांनी पाहिलं नसेल का त्यांनी कशी गोलंदाजी केली? त्यानुसार तुम्हीही गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे होते.” रॉजर बिन्नी यांनी १९८३ विश्वविजेेत्या भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. आजच्या दिवशी १९८३ मध्ये भारतीय संघाने पहिल्यांदा विश्वचषक स्पर्धा जिंकली होती.
महत्वाच्या बातमी –
WTC फायनल पराभवातून भारताला मिळाला धडा, कसोटी मालिकेपुर्वी ईसीबीला केली ‘ही’ विनंती
सलग दुसरा सामना जिंकत इंग्लंडने केले ‘लंकादहन’, टी२० मालिका घातली खिशात
INDvNZ: कर्णधार कोहलीचे टीकाकारांना सणसणीत प्रत्युत्तर; म्हणाला, ‘हा एक संघ नसून…’