---Advertisement---

कोरोनाची बाधा झालेला सचिन रुग्णालयात भरती, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती

On: शुक्रवार, एप्रिल 2, 2021 11:30 AM
---Advertisement---

भारतात सध्या कोविड-१९ महामारीने पाय पसारले आहेत. काही दिवसांपुर्वी मास्टर ब्लास्टर आणि भारताचा महान फलंदाज सचिन तेंडूलकर हादेखील कोरोनाच्या विळख्यात सापडला होता. त्यानंतर त्याने स्वत:ला घरातच क्वारंटाईन केले होते. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्याने जवळच्या रुग्णालयात क्वारंटाईनमध्ये राहण्याचे ठरवले आहे. स्वत: सचिनने यासंदर्भात माहिती दिली आहे.

आज (२ एप्रिल) पूर्ण भारतात २०११ सालच्या विश्वचषक विजयाच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. अनेकांनी सोशल मीडियाद्वारे भारतीय क्रिकेटपटूंना त्यांच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अशात सचिननेही त्याच्या संघ सहकाऱ्यांना शुभेच्छा देत आपण रुग्णालयात भरती झालो असल्याची माहिती दिली आहे.

ट्विट करत त्याने लिहिले आहे की, ‘मला शुभेच्छा देण्यासाठी आणि माझ्यासाठी प्रार्थना करण्यासाठी तुम्हा सर्वांचे आभार. माझ्या कुटुंबीयांना माझ्यामुळे कोरोनाची लागण होऊ नये मी वैद्यकिय सल्ल्यानुसार जवळच्या रुग्णालयात क्वारंटाईन झालो आहे. लवकरच मी घरी परतण्याची आशा करतो. सर्व भारतवासींना आणि माझ्या संघ सहकाऱ्यांना विश्वचषक विजयाच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा.’

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएल २०२१: आगळ्यावेगळ्या कारणांनी ‘या’ क्रिकेटपटूंना करण्यात आले बॅन, ३ आहेत भारतीय

‘या’ नवोदित शिलेदारांचे उजळणार नशीब, चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी पदार्पणाची मिळणार संधी?

बापरे! २०११ विश्वविजेत्या संघातील १६ पैकी केवळ दोन जण आजही खेळताय टीम इंडियाकडून क्रिकेट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---