आयपीएल 2021 मध्ये डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱअया सनरायझर्स हैदराबाद संघाची यंदाच्या मोसमातील कामगिरी खूप निराशाजनक राहिली आहे. संघातील प्रमुख खेळाडू केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत या स्पर्धेतील सलग तिसर्या पराभवाचा संघाला सामना करावा लागला आहे. शनिवार (17 एप्रिल) रोजी झालेल्या सामन्यात पाच वेळच्या आयपीएल विजेता मुंबई इंडियन्सकडून हैदराबाद संघाला 13 धावांनी पराभव पत्करावा लागला.
या सामन्यात एकावेळी जॉनी बेयरस्टो आणि वॉर्नरच्या स्फोटक फलंदाजीच्या बळावर संघ लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करीत होता. पण ते दोघे तंबूत परतण्यानंतर संघातील कोणताही फलंदाज चांगली खेळी करू शकला नाही. संघाने पराभवाची हॅट्रिक केल्यानंतर माजी भारतीय खेळाडू आणि समलोचक संजय मांजरेकर यांनी संघ व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पराभवाचे कारण सांगितले आहे.
सनरायझर्स हैदराबादच्या पराभवानंतर त्यांनी एक ट्विट केले. त्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, ‘मला माफ करा. पण जेव्हा कोणताही संघ अभिषेक शर्मा, विराट सिंग आणि अब्दुल समद अशा युवा खेळाडूंना अंतिम अकरामध्ये एकत्र खेळायला घेईल; तेव्हा तो संघ जिंकूच शकत नाही.’
त्यांनी असे बोलण्यामागचे कारण म्हणजे या तीन तरुण खेळाडूंची या सामन्यातील कामगिरी काहीच खास नव्हती. या सामन्यात विराटने 12 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 11 धावा केल्या. तर अभिषेकने अवघ्या 2 धावा केल्या. त्यानंतर संघातील नियमित खेळाडू अब्दुल समद हा सुद्धा अपयशी ठरला. अवघ्या 7 धावा करून तो हार्दिक पांड्याकडून धावबाद झाला.
Sorry to say, but anyone that picks Abhishek Sharma, Virat Singh and Abdul Samad all together in one playing XI does not deserve to win.
— Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) April 17, 2021
सनरायझर्स हैदराबादला सध्या त्यांच्या मधल्या फळीत खेळणाऱ्या केन विलियम्सनची कमी जाणवत असून त्याच्या संघात सामील होण्याबाबत बोलताना कॅप्टन वॉर्नरने म्हटले आहे की, “आम्हाला विलियम्सनबद्दल डॉक्टरांशी बोलावे लागेल. तो त्याच्या दुखापतीतून बरा होत असून आमच्या संघात त्याची खूप मोठी भूमिका आहे.”
सनरायझर्सचा पुढील सामना 21 एप्रिल रोजी पंजाब किंग्ज विरुद्ध एमए चिंदबरम या स्टेडीयमवरच होणार असून या सामन्यात विलियम्सन खेळताना दिसू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
दिनेश कार्तिकचा मोठा खुलासा, ‘या’ कारणामुळे गतवर्षी अर्ध्यातच सोडले होते केकेआरचे कर्णधारपद
ग्लेन मॅक्सवेलच्या धडाकेबाज खेळीमागे कर्णधार कोहलीचा हात, पाहा कुणी केलंय हे भाष्य