---Advertisement---

अरेरे! बड्डेदिनी आफ्रिदी झाला ट्रोल; नेटकरी म्हणाले, ‘४१, ४४ का ४६ नक्की कितवा वाढदिवस?’ 

On: सोमवार, मार्च 1, 2021 5:54 PM
Shahid-Afridi
---Advertisement---

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याचा आज (१ मार्च) वाढदिवस आहे. आजच्याच दिवशी १९८० मध्ये त्याचा जम्न झाला होता. या खासदिनी ट्विट करत त्याने सर्वांचे आभार व्यक्त केले. दरम्यान त्याने ट्विटमध्ये आपण आमूक वर्षांचे झालो असल्याचेही सांगितले. यावरुन ट्विटरवर एक नवा वाद पेटला असून नेटकऱ्यांनी त्याला धारेवर धरले आहे.

त्याचे झाले असे की, आफ्रिदीने ट्विटमध्ये तो यंदा त्याचा ४४ वा वाढदिवस साजरा करत असल्याचे सांगितले. परंतु क्रिकबझ आणि ईएसपीएन क्रिकइंफो या क्रिकेटच्या प्रसिद्ध वेबसाइटवर त्याचे वय ४१ वर्षे दिले आहे. तसेच १९८० साली जन्म झाल्यामुळे आकडेवारीनुसारही त्याचे वय ४१ वर्षच येते. परंतु स्वत: आफ्रिदीने आपले वय चुकीचे लिहिल्यामुळे नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

‘तुझं वय नक्की ४१ आहे का ४४ का ४६?’ अशी विनोदी प्रतिक्रिया काहींनी दिली आहे. तर काहींनी आपले जन्मवर्ष देत माझे वय आफ्रिदीच ठरवले, अशी गमतीशीर प्रतिक्रिया दिली आहे. याउलट अनेकांनी त्याची वयोवर्षातील गडबड दुर्लक्षित करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

शाहिद आफ्रिदीची क्रिकेट कारकिर्द

आफ्रिदीच्या क्रिकेट कारकिर्दीविषयी बोलायचे झाले तर, त्याने ऑक्टोबर १९९६ मध्ये केनिया संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. तर मे २०१८ ला शेवटचा सामना खेळला होता. यादरम्यान ३९८ वनडे सामन्यात पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्त्व करताना त्याने ८०६४ धावा आणि ३९५ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच ९९ टी२० सामन्यात १४१६ धावा आणि ९८ विकेट्सची कामगिरी केली होती. शिवाय २७ कसोटी सामन्यात १७१६ धावा आणि ९८ विकेट्सची नोंद केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

‘आय ऍम बार्बी गर्ल’ म्हणतं हार्दिक पंड्याच्या बायकोचा भन्नाट डान्स, व्हिडिओ होतोय व्हायरल

आयपीएल आयोजनात तीन संघांचा खोडा! ‘हे’ कारण देत केली त्रयस्थ ठिकाणाची मागणी

शार्दुलचा सुपरहिट शो! विजय हजारे ट्रॉफीत एक-दोन नव्हे ५ गोलंदाजाना थकवलं, चोपल्या ‘इतक्या’ धावा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---