भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील 5 सामन्यांच्या बाॅर्डर-गावसकर मालिकेतील दुसरा कसोटी सामना ॲडलेडच्या मैदानावर रंगला आहे. दरम्यान मिचेल स्टार्कच्या (Mitchell Starc) घातक गोलंदाजीमुळे ॲडलेडमध्ये खेळाच्या पहिल्या दिवशी भारतीय संघ 180 धावांत गुंडाळला गेला. पहिल्या डावात भारतीय फलंदाजांनी पूर्णपणे निराश केले. त्यानंतर भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकरांनी (Sunil Gavaskar) भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीवर निराशा व्यक्त केली आहे.
भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकरांनी (Sunil Gavaskar) ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीबद्दल निराशा व्यक्त करत त्यांनी गुलाबी चेंडूने चांगली कामगिरी करायला हवी होती, असे म्हटले आहे. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या 6 विकेट्समुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात भारताला 180 धावांत गुंडाळल्यानंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत 1 विकेटवर 86 धावा केल्या आहेत.
सुनिल गावसकरांनी (Sunil Gavaskar) ‘स्टार स्पोर्ट्स’शी बोलताना सांगितले की, “त्यांना (फलंदाजांना) जास्तीत जास्त खेळायला भाग पाडावे लागेल, तुम्ही फलंदाजाला अधिक चेंडू खेळण्यास भाग पाडून यश मिळवू शकता. काही चेंडू टाकल्यानंतर बुमराहने जसे पर्थ कसोटीत लाबुशेन आणि मॅकस्वीनीच्या विरोधात केले होते. तसे भारतीय गोलंदाजांनी गुलाबी चेंडूने केले नाही, जे त्यांनी करायला हवे होते.”
महत्त्वाच्या बातम्या-
विराट-राहुलसाठी स्टार्कने आखला होता खास प्लॅन! दिग्गजाचा मोठा खुलासा
IND vs AUS; स्लेजिंग मूडमध्ये विराट कोहली, ऑस्ट्रेलिया फलंदाजांना केले तंग
मोहम्मद सिराजने मोडला शोएब अख्तरचा वेगवान चेंडू टाकण्याचा विश्वविक्रम?






