भारतीय हॉकी संघाचे (indian hockey team) माजी कर्णधार चरणजीत सिंग (charanjit singh) यांचे निधन झाले आहे. त्यांचे वय ९२ वर्ष होते. ऊनामध्ये आपल्या राहत्या घरी त्यांनी शेवटचा श्वास घेतला आणि गुरुवारी (२७ जानेवारी) त्यांची प्राणज्योत मावळली. मागच्या काही दिवसांपासून त्यांच्या आरोग्याविषयी सतत तक्रारी समोर येत होत्या. अशात गुरुवारी त्यांचे दुःखद निधन झाले आहे.
चरणजीत सिंग यांचा जन्म ३ फेब्रुवारी १९३१ साली ऊनामध्ये झाला होता. ते भारताचे एक महान हॉकी खेळाडू आणि कर्णधार होते. त्यांच्या नेतृत्वात भारताने १९६४ साली टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. माहितीनुसार, चरणजीत सिंगांनी पंजाबमध्ये गुरदासपूर आणि लायलपूर या ठिकाणांहून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर त्यांनी लुधियानामध्ये बीएससी एग्रीचे शिक्षण घेतले. पुढे ते हिमाचल प्रदेश विश्वविद्यालय, शिमला याठिकाणी शारीरिक शिक्षण विभागाच्या संचालकपदी कार्यरत होते. शालेय पातळीतवर त्यांनाी सर्वप्रथम हॉकी खेळायला सुरुवात केली होती.
व्हिडिओ पाहा- आणि विराट कोहलीला धरावे लागले सचिनचे पाय
चरणजीत सिंग सर्वप्रथम १९४९ साली पंजाब युनिवर्सिटीच्या हॉकी संघात सहभागी झाले होते आणि नंतर त्यांना युनिवर्सिटीच्या संघाचे कर्णधारपद सोपवले गेले. १९५० मध्ये त्यांना भारतीय हॉकी संघासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली. १९५१ आणि १९५५ साली भारतीय हॉकी संघाने केलेल्या पाकिस्तान दौऱ्यातही चरणजीत सहभागी होते. तसेच १९५९ साली युरोप दौऱ्यातही ते सहभागी होते. त्यांनी भारतीय संघासोबत रोम ऑलिम्पिकही खेळली, पण दुखापतीमुळे या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ते खेळू शकले नाहीत. चांगल्या प्रदर्शनाच्या जोरावर त्यांनी १९६१ साली भारतीय संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली. पुढे त्यांच्या नेतृत्वात संघाने टोकिओ ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपद जिंकले.
On behalf of Hockey India, we mourn the loss of a great figure of Indian Hockey, Shri Charanjit Singh.
May his soul Rest in Peace🙏 pic.twitter.com/PTb38lHDS6
— Hockey India (@TheHockeyIndia) January 27, 2022
१९६४ मध्ये ठरले पद्मश्री पुरस्काराचे मानकरी
दरम्यान, चरणजीत सिंगांचे सततचे चांगले प्रदर्शन पाहता, त्यांना १९६३ मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले गेले होते. पंरतु त्यानंतर १९६४ मध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकल्यानंतर, भारत सरकारकडून त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला गेला. त्याव्यतिरिक्त त्यांना राज्यस्तरिय आणि इतरही काही महत्वाच्या पुरस्काराने सन्मानित केले गेले होते.
महत्वाच्या बातम्या –
रवी शास्त्रींकडे आजही नाही धोनीचा फोन नंबर, माजी मुख्य प्रशिक्षकांनीच सांगितले याचे खास कारण
आयपीएल आयोजनासाठी ‘या’ देशाकडून आली बीसीसीआयला ऑफर; दर्जेदार सुविधांची दिली खात्री
देने वाला जब भी देता है…! आधी आयपीएलच्या नव्या संघात संधी अन् आता भारतीय संघातही निवड
व्हिडिओ पाहा –