गतवर्षी पार पडलेली आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ (icc T20 world cup 2021) स्पर्धा ही रवी शास्त्री यांच्या भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा होती. ही स्पर्धा झाल्यानंतर राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी मुख्य प्रशिक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला होता. सध्या रवी शास्त्री (Ravi Shastri) हे ओमानमध्ये सुरू असलेल्या लेजेंड्स क्रिकेट लीग स्पर्धत व्यस्त आहेत. दरम्यान त्यांनी शोएब अख्तर सोबत बोलताना एमएस धोनीचे तोंडभरून कौतुक केले आहे.
शोएब अख्तरसोबत चर्चा करताना रवी शास्त्री यांनी म्हटले की, “एमएस धोनी एक अविश्वसनीय खेळाडू होता. मी त्याच्यासारखा व्यक्ती आजवर पाहिला नाहीये. मी अनेक खेळाडूंना खेळताना पाहिलं आहे. सचिन तेंडुलकरला ही खेळताना पाहिलं आहे. परंतु, त्याला देखील कधी कधी राग यायचा. परंतु, धोनीसारखा मी आजवर नाही पाहिला. धोनीला माहीत नाही की, राग कसा करायचा असतो.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “शून्य धाव करा, शतक करा, अंतिम सामन्यात विजय मिळवा किंवा पहिल्याच सामन्यात बाहेर व्हा. त्याला काहीच फरक पडत नाही. आजपर्यंत माझ्याकडे त्याचा नंबर देखील नाहीये आणि मी मागितलाही नाही कधी. कारण मला माहीत आहे की, त्याच्याकडे फोन नसतो आणि त्याच्यासोबत कसं बोलायचं हे तुम्हाला माहीत आहे.”
तसेच विराट कोहलीबद्दल बोलताना रवी शास्त्री म्हणाले की, “मैदानावर तो एका बिस्टसारखा आहे, पण मैदानाबाहेर तो पूर्णपणे वेगळा आहे. त्याला फक्त मैदानावरील शत्रुत्व माहीत आहे आणि या बाबतीत त्याला कुठल्याही गोष्टीचा फरक पडत नाही. मैदानाबाहेर तो खूप शांत असतो. रोहित शर्मा देखील धोनी सारखा आहे आणि थोडा शांत आहे.” रवी शास्त्री हे आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेपर्यंत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होते.
महत्वाच्या बातम्या :
भारतीय संघातील ३ न्यू कमर्स, ज्यांना मिळू शकते वनडे पदार्पण करण्याची संधी
हे नक्की पाहा :






