भारतीय संघाचा श्रीलंका दौरा आहे. 27 जुलैला भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये पहिला टी20 सामना खेळला जाणार आहे. श्रीलंका दौऱ्यावर भारत 3 सामन्यांची टी20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. भारतीय संघ जाहीर झाल्यानंतर अनेक दिग्गज खेळाडूंनी निवडकर्त्यांवर प्रश्न उठवले आहेत. तसंच माजी भारतीय खेळाडू आकाश चोप्रानं (Aakash Chopra) देखील निवडकर्त्यांना प्रश्न विचारला आहे.
आकाश चोप्रा (Aakash Chopra) त्याच्या युट्युब चॅनवर म्हणाला, “कुलदीप यादवबद्दल मला आश्चर्य वाटत आहे. कारण त्याचं नाव श्रीलंकेविरुद्ध टी20 मध्ये नाही आणि एकदिवसीय संघात आहे. असं काय झालं? की त्याचा टी20 संघात समावेश केला नाही. पण एकदिवसीय मालिकेसाठी संघात समावेश केला. कुलदीप यादव टी20 विश्वचषकामध्ये भारतीय संघाचा भाग होता. तिथं त्यानं जोरादार कामगिरी केली. परंतू तो आता श्रीलंकेविरुद्धच्या टी20 साठी भारतीय संघाचा भाग नाही.”
2024च्या झालेल्या टी20 विश्वचषकात कुलदीप यादव (Kuldeep Yadav) भारतीय संघात सामील होता. कुलदीपनं टी20 विश्वचषकात चमकदार कामगिरी केली. ज्यावेळी भारताला विकेट्सची गरज पडली तेव्हा त्यानं भारताला विकेट मिळवून दिली. टी20 विश्वचषकात त्यानं भारतासाठी 5 सामने खेळले. त्यामध्ये त्यानं महत्वपूर्ण 10 विकेट्स घेतल्या. याधीही त्यानं टी20 क्रिकेटमध्ये भारतासाठी महत्वपूर्ण विकेट्स मिळवून सामने जिंकून दिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी बीसीसीआयचा मोठा निर्णय! भारतीय खेळाडूंसाठी मदतीची घोषणा
माहीच्या निवृत्तीबद्दल मोहम्मद शमीनं केलं वक्तव्य! म्हणाला, “धोनीच्या भविष्यावर…”
कोण आहे साईराज बहुतुले? श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून झाली निवड