आयपीएल 2025च्या हंगामाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. पण 2025च्या हंगामापूर्वी मेगा लिलाव होणार आहे. तत्पूर्वी रोहित शर्मा (Rohit Sharma) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) सोडणार का? याबद्दल चर्चा होऊ लागल्या आहेत. दरम्यान माजी भारतीय खेळाडू प्रज्ञान ओझाने (Pragyan Ojha) रोहित शर्माच्या (Rohit Sharma) भविष्याबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
रोहित शर्माचे (Rohit Sharma) मुंबई इंडियन्ससोबतचे भवितव्य हा चर्चेचा विषय बनला आहे, कारण गेल्या हंगामापूर्वी त्याला कर्णधारपदावरून हटवून त्याच्या जागी हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते. तेव्हापासून रोहित आणि मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनामध्ये संभाव्य मतभेदाबद्दल अफवा पसरत आहेत, ज्यामुळे तो नवीन संघात सामील होण्याचा विचार करत असल्याची अटकळ बांधली जात आहे.
प्रज्ञान ओझाने (Pragyan Ojha) आयएएनएसशी बोलताना सांगितले की, “मला वाटते की फ्रेंचायझी क्रिकेट हे राज्य आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे कारण त्याचे नियम पूर्णपणे वेगळे आहेत. पण वैयक्तिकरित्या, जर तुम्ही मला विचाराल तर, मी रोहित शर्माला अशा स्तरावर वाढताना पाहिले आहे. त्यामुळे मला वाटते की तो जर मुंबई इंडियन्ससोबत राहिला तर खूप छान होईल कारण रोहितचे त्याच्याशी निगडित असलेले बरेच चाहते आणि प्रायोजक आहेत.”
पुढे बोलताना प्रग्यान ओझा म्हणाला, “आम्हाला वाट पहावी लागेल. पण वैयक्तिकरित्या, मला नेहमीच रोहित शर्माशी जोडलेले वाटते, कारण तो प्रथम डेक्कन चार्जर्स आणि नंतर मुंबई इंडियन्सकडून खेळला. मुंबईसाठी खेळताना मला नेहमीच त्याच्याशी जोडले असल्याची भावना राहायची. कारण तो मुंबईचा राजा आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
भारताविरुद्धची कसोटी मालिका जिंकण्यासाठी बांगलादेश वापरणार ‘हा’ फॉर्म्युला, कर्णधाराचा खुलासा
समालोचकाला दिवसाला मिळतो चक्क इतका पगार? आकाश चोप्राचा मोठा खुलासा
“धोनी नॉनव्हेज खायचा, पण माझ्यासाठी त्याने महिनाभर शाकाहारी जेवण खाल्ले”, जुन्या रूममेटचा खुलासा