भारतीय संघ घरच्या मैदानावर बांगलादेशविरूद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेला (19 सप्टेंबर) पासून सुरूवात होणार आहे. त्यातील पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. दोन्ही संघातील पहिला सामना चेन्नईच्या मैदानावर रंगणार आहे. मात्र या मालिकेपूर्वी भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी भारतीय संघाला सतर्कतेचा इशारा दिला आहे.
शेवटच्या कसोटी मालिकेत बांगलादेशने पाकिस्तानचा त्यांच्याच घरात घुसून पराभव केला आहे. बांगलादेश आता (19 सप्टेंबर) रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर भारताविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळणार आहे. यानंतर (27 ऑक्टोबर) पासून ग्रीन पार्क, कानपूर येथे दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे.
सुनील गावसकर यांनी मिड डेच्या कॉलममध्ये लिहिले आहे की, “बांगलादेशने पाकिस्तानला त्यांच्या भूमीवर पराभूत करून आपण एक मजबूत संघ असल्याचे सिद्ध केले आहे. मागच्या वेळी भारताने बांगलादेशचा दौरा केला तेव्हाही बांगलादेशने भारताला टक्कर दिली होती. आता पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर ते भारताला आव्हान देण्यासाठी येत आहेत. आता कोणताही संघ त्यांना हलक्यात घेऊ शकत नाही.”
पुढे सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी लिहिले की, “भारताला पुढील साडेचार महिन्यांत 10 कसोटी सामने खेळायचे आहेत आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी त्यांना किमान पाच कसोटी सामने जिंकावे लागतील. कोणताही सामना सोपा होणार नाही. आंतरराष्ट्रीय हंगाम सुरू होण्यापूर्वी दुलीप ट्रॉफीचे (Duleep Trophy) आयोजन करणे हा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (BCCI) शहाणपणाचा निर्णय आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सचिन 194 धावांवर खेळत असताना जेव्हा द्रविडने डाव केला होता घोषित, चोप्राने सांगितला तो किस्सा
टी20 विश्वचषकाच्या इतिहासात एकही सामना न जिंकू शकलेले संघ
निवृत्तीनंतर शिखर धवन पहिल्यांदाच ॲक्शनमध्ये, स्पेशल टूर्नामेंटची तयारी सुरू






