पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यातील ३ सामन्यांची वनडे मालिका संपन्न झाली. या मालिकेत भारतीय संघाने २-१ ने विजय मिळवला होता. तसेच या मालिकेत कृणाल पंड्याला संधी देण्यात आली होती. त्याने पहिल्याच सामन्यात अर्धशतक झळकावले होते. पण त्याला गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करण्यास अपयश आले होते. अशातच भारतीय संघाच्या माजी निवडकर्त्याने कृणालच्या वनडे क्रिकेटमध्ये खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
कृणाल पंड्याने इंग्लंड विरुद्ध झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात अर्धशतकी खेळी करत जोरदार पदार्पण केले होते. परंतु त्याला गोलंदाजी करताना गडी बाद करण्यात अपयश आले होते. याबाबत बोलताना माजी निवडकर्ते शरनदिप सिंग यांनी म्हटले आहे की,” कृणाल पंड्याने उत्कृष्ट फलंदाजी केली, परंतु तो १० षटक गोलंदाजी करू शकत नाही. तो टी२० क्रिकेटसाठी एक उत्तम खेळाडू आहे. परंतु गोष्ट जेव्हा वनडे क्रिकेटची येते तेव्हा कृणालकडे विरोधी खेळाडूंना अडचणीत टाकण्याची क्षमता नाही. जर वनडे क्रिकेटमध्ये हार्दिक पंड्या गोलंदाजी करत नसेल तर कृणाल पंड्या तुमचा ५ वा गोलंदाज असूच शकत नाही.”
तसेच इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात कर्णधार विराट कोहलीने रोहित शर्मासोबत सलामीला फलंदाजी केली होती. सामन्यानंतर त्याने टी२० क्रिकेटमध्ये देखील रोहित सोबत डावाची सुरुवात करणार असे वक्तव्य केले होते.
याबाबत बोलताना शरनदिप सिंग म्हणाले, “आगामी टी२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघासाठी रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनीच सलामी फलंदाजी करावी. शिखर धवन मानसिकदृष्टया खूप मजबूत आहे. असे ही होऊ शकते की त्यांना काही पर्याय अंमलात आणायचे असतील. पण मला असे वाटते की रोहित आणि शिखर यांचे डाव्या आणि उजव्या हाताचे कॉम्बिनेशन योग्य आहे. तुम्ही एका सामन्याच्या निकालावरून आकलन करू शकत नाही.”
महत्त्वाच्या बातम्या –
“मी टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना पाहाणार नाही”, दिग्गज गोलंदाजाचे मोठे भाष्य
किस्से क्रिकेटचे – मैदानावर हत्ती आला आणि भारतीय संघाने इंग्लंडमध्ये विजयाचा श्रीगणेशा केला