माजी भारतीय क्रिकेटपटू भागवत सुब्रमण्यम चंद्रशेखर यांची तब्येत बिघडल्या कारणाने त्यांना सोमवारी (१८ जानेवारी) बंगळुरूच्या एका रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. चंद्रशेखर हे सध्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे प्रवक्ता विनय मृथुंजय्या यांनी याविषयी माहिती दिली आहे.
चंद्रशेखर यांची पत्नी संध्या म्हणाल्या की, “चंद्रशेखर हे चांगल्या अवस्थेत होते आणि ते क्रिकेट सामना पाहात होते. यादरम्यान अचानक त्यांना थकवा जाणवू लागला आणि त्यांना बोलताना त्रास होऊ लागला. त्यामुळे आम्ही त्वरित त्यांना रुग्णालयात दाखल केले. आता त्यांची तब्येत ठीक आहे आणि २ दिवसांत त्यांना घरी सोडण्यात येईल.”
चंद्रशेखर यांची क्रिकेट कारकिर्द
चंद्रशेखर यांना क्रिकेटजगतातील महान फिरकीपटूंमध्ये गणले जाते. ते ‘गुगली स्टार’ या नावानेही प्रसिद्ध आहेत. १९६१ ते १९७९ या कालावधीत त्यांनी भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्त्व केले होते. दरम्यान ५८ कसोटी सामने खेळत २४२ विकेट्स त्यांनी घेतल्या होत्या. यात त्यांच्या ७९ धावांवर ८ विकेट्स घेण्याच्या सर्वोत्तम कामगिरीचा समावेश होता. तसेच फेब्रुवारी १९७६ मध्ये त्यांनी न्यूझीलंडविरुद्ध एकमेव वनडे सामना खेळला होता. या सामन्यात त्यांनी न्यूझीलंडच्या ३ फलंदाजांना बाद केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
स्मिथनंतर आता रोहितही दिसला क्रिजमध्ये शाडो बॅटिंग करताना, व्हिडिओ होतोय व्हायरल
श्रीलंकाच्या विकेटकीपरने चालू सामन्यात संघ सहकाऱ्याला मारली चापट, सेहवागने घेतली फिरकी