दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यातील शुभमन गिल याच्या निराशजनक कामगिरीवर माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. आकाश चोप्राने गिलच्या आकड्यांबद्दल चिंता व्यक्त केली असून टी20 मधील शुभमन गिलचे आकडे तितकेसे चांगले राहिलेले नाहीत. चोप्राच्या मते, गिलच्या फलंदाजीत सातत्याचा अभाव आहे.
शुभमन गिल (Shubman Gill) याच्याबद्दल बोलायचे झाले तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात त्याची कामगिरी चांगली नव्हती. त्याला सहा चेंडूंत केवळ आठ धावा करता आल्या, त्यात दोन चौकारांचा समावेश होता. मागील सामन्यात तो खाते न उघडताच बाद झाला होता आणि ही मालिका त्याच्यासाठी फारशी चांगली नव्हती.
आकाश चोप्रा (Akash Chopra) याने त्याच्या यूट्यूब चॅनलवर एका संभाषणादरम्यान शुभमन गिलच्या फ्लॉप कामगिरीवर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “शुभमन गिलच्या टी20 आकडेवारीत सातत्याचा अभाव आहे. त्याने एक-दोन मोठ्या खेळी नक्कीच खेळल्या आहेत पण या काळात त्याने अनेक कमी धावसंख्याही केल्या आहेत. याशिवाय डाव्या हाताच्या फिरकीपटूंविरुद्ध त्याला अडचणींचा सामना करावा लागतो. माझ्या माहितीनुसार, तो पॉवरप्लेमध्ये डाव्या हाताच्या फिरकीपटूंविरुद्ध दीावात खेळतो.”
भारतीय संघाने जोहान्सबर्गमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 106 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 7 विकेट्स गमावून 201 धावा केल्या. यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) याने 41 चेंडूत 61 तर कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने 56 चेंडूत 100 धावा केल्या. प्रत्युत्तरात आफ्रिका संघ 13.5 षटकांत केवळ 95 धावांवरच सर्वबाद झाला. कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याने जबरदस्त गोलंदाजी करत अवघ्या 17 धावांत 5 विकेट्स घेतल्या. यासह मालिका 1-1अशी बरोबरीत राहिली. (Former legend says Shubman Gill’s major weakness Said He in the Powerplay)
हेही वाचा
नाद करा पण भारतीय महिलांचा कुठं! इंग्लंडला 136 धावांवर केले All Out, दीप्तीने पूर्ण केले विकेट्सचे पंचक
T20 World Cup 2024: सातासमुद्रापार आमने-सामने येणार भारत-पाकिस्तान, ‘या’ शहरात रंगणार सामना; लगेच वाचा