भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या टी20 सामन्यात सलामीवीर ऋतुराज गायकवाड याने जबरदस्त शतक झळकावले. माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, ऋतुराज गायकवाड यानी आपल्या उत्कृष्ट खेळीने हे सिद्ध केले आहे की आपल्या खेळीची शैली आपल्याला स्वातंत्र्य देते.
तिसऱ्या टी20 सामन्यात ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याची कामगिरी चांगली राहीली. त्याने सुरुवातीला थोडा वेळ घेतला पण त्यानंतर त्याने चांगली फलंदाजी करत आपले शतक पूर्ण केले. गायकवाडने 57 चेंडूत 13 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने नाबाद 123 धावा करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले.
ऋतुराज गायकवाडने आपल्या खेळीदरम्यान फक्त क्रिकेट शॉट्स खेळले असून आकाश चोप्रा (Aakash Chopra) याने याबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. यूट्यूब चॅनलवरील संभाषणादरम्यान तो म्हणाला, “सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने सुरूवातीपासून स्फोटक फलंदाजी केली ज्यासाठी तो ओळखला जातो. ऋतुराजने पहिल्या 22 चेंडूत 22 धावा केल्या आणि तुम्ही विचार करत असाल की हे काय होत आहे. परंतु त्यावेळी सूर्यकुमार यादव मारत होता आणि ऋतुराज गायकवाड वेळ घेत होता. 210-220 धावा व्हायला हव्या होत्या. त्यापेक्षा कमी धावात तुम्ही लढू शकत नाही. यानंतर ऋतुराजने गीअर बदलला. शैली तुम्हाला बांधून ठेवत नाही, उलट ते तुम्हाला स्वातंत्र्य देते, हे अनेक खेळाडू तुम्हाला वारंवार जाणवून देतात. त्याने खूप चांगली फलंदाजी केली.”
गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या तिसर्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने भारताचा 5 विकेटने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित 20 षटकात 3 बाद 222 अशी मोठी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघाने 20 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हे लक्ष्य गाठले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेतही आपल्या आशा कायम ठेवल्या आहेत. (Former legend’s big statement about Rituraj who scored a century against Australia Said On the contrary, freedom)
महत्वाच्या बातम्या
केनने दाखवला क्लास! 29 वे शतक ठोकत बनवले अनेक विक्रम, विराट-ब्रॅडमन यांची…
विराटविना दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार टीम इंडिया! रोहितबाबतही महत्त्वाचे अपडेट, वाचा सविस्तर