मुंबई क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू आणि कांगा लीगचे महान खेळाडू राहिलेल्या मेहली ईरानी यांचे दुंबईत निधन झाले आहे. ते ९० वर्षांचे होते. कांगा लीग ही मुंबईच्या पावसाळी हंगामातील प्रसिद्ध क्रिकेट स्पर्धा आहे. मुंबई क्रिकेट संघाच्या (एमसीए) उच्च समितीचे सदस्य आणि प्रख्यात क्यूरेटर नदीम मेनन यांनी सोमवारी (५ एप्रिल) यासंदर्भात माहिती दिली आहे.
न्यूज एजन्सी पीटीआयला बोलताना मेनन म्हणाले की, “ईरानी यांचे शनिवारी दुबईत निधन झाले आहे. त्यापुढील दिवशी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.”
डावखुरे यष्टीरक्षक फलंदाज ईरानी हे जवळपास ५० वर्षे कांगा लीगचा भाग राहिले होते. त्यांनी क्लब पातळीवर बॉम्बे अर्थात मुंबई जिमखाना आणि पारसी सायक्लिस्ट्स संघाचे प्रतिनिधित्त्व केले होते. एमसीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “ईरानी यांनी १९५३-५४ मध्ये बडोदा संघाविरुद्ध मुंबईकडून एकमेव देशांतर्गत सामना खेळला होता.”
नारी कॉन्ट्रॅक्टर, फारुख इंजिनियर, करसन घावरी आणि गुलाम पारकर यांसारखे कसोटीपटू पारसी सायक्लिस्ट्स संघात ईरानी यांच्या नेतृत्त्वाखाली खेळले होते. ईरानी यांचे एकेकाळचे संघ सहकारी आणि माजी भारतीय कर्णधार कॉन्ट्रॅक्टर यांनी ईरानी यांच्या मृत्यूचे वृत्त कळाल्यानंतर शोक व्यक्त केला आहे. ईरानी हे एक चांगले क्रिकेटपटू होते, असे त्यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
द्विशतक पूर्ण नाही झाले, पण फखर जमानने सचिन तेंडुलकरला मागे टाकत केला ‘हा’ विश्वविक्रम
मुंबईतील आयपीएल सामन्यांवर होणार का लॉकडाऊन इफेक्ट? पाहा काय म्हणाले सौरव गांगुली
‘या’ कारणामुळे वॉशिंग्टन सुंदरने आपल्या पाळीव कुत्र्याचे नाव ठेवले ‘गॅबा’